Kolhapur

निवडणूकीचे कर्तव्य बजावित असताना शिक्षक सर्जेराव भोसले काळाच्या पडदयाआड.

निवडणूकीचे कर्तव्य बजावित असताना श्री लक्ष्मी विद्यालय ,ज्यूनिअर कॉलेजचे हसतमुख,विदयार्थीप्रिय शिक्षक सर्जेराव भोसले काळाच्या पडदयाआड.

सुभाष भोसले-कोल्हापूर
निवडणूकीचे कर्तव्य बजावत असलेल्या पोहाळे ,ता पन्हाळा केंद्र क्रमांक 2 मधील मतदान अधिकारी व श्री लक्ष्मी विद्यालय ,ज्यूनिअर कॉलेज हसूर खुर्द चे शिक्षक सर्जेराव तुकाराम भोसले यांचा सोमवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने सी पी आर हॉस्पीटल येथे उपचार सुरू असताना मृत्यु झाला.सर्जेराव तुकाराम भोसले हसूर ,ता.कागल येथील रहीवाशी असून निवडणूकीचे कर्तव्य बजावत असताना त्यांचा मृत्यू झाल्याने सपूर्ण कुंटुबिय व गावावर शोककळा पसरली आहे.करवीर मतदारसंघातील पोहाळे,बोरगाव येथे त्यांची मतदान अधिकारी क्रंमाक एक म्हणून नेमणूक झाली होती ते रविवारीच निवडणूकीच्या कर्तव्यासाठी हजर झाले होते.सोमवारी सकाळी मतदान सुरू झाले.

मतदाना प्रक्रिया सुरळीत चालू असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना जवळच्या खाजगी दवाखान्यात दाखल केले परतु त्यांची प्रकृती जास्त बिघडल्याने तेथील डॉक्टरानी शक्य ते उपचार करून तेथून त्यांना त्वरीत सीपीआर कोल्हापूर येथे दाखल करण्यास सांगितले यावेळी मंडल अधिकारी एस डी खोत ,त्यांचे जवळचे मित्र व न्यायमूर्ती रानडे विद्यालयाचे पर्यवेक्षक व त्यांचे मित्र एस.डी साठे ,क्षेत्रिय अधिकारी आर.जी. पाटील यांनी त्यांच्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले परतुं त्यांना सीपीआर कोल्हापूर येथे नेले असताना उपचार चालू असताना त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरानी सांगितले त्यानंंतर त्यांचे शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या हाती देण्यात आला.त्यांचा अचानक मृत्यू झाल्याचे समजताच सर्व शिक्षक बंधू भगिनी ,प्रशासन अधिकारी यांचेकडून हळहळ व्यक्त होत आहे.

सर्जेराव भोसले हे लक्ष्मी विदयालय व ज्यूनियर कॉलेज हसूर खुर्द येथे हिदी विषयाचे अध्यापन करत होते.अत्यंत विदयार्थीप्रिय शिक्षक अशी त्यांची ख्याती होती त्यांच्या मृत्यूने सपूंर्ण कापशी परीसरात शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा ,मुलगी,आई असा परीवार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button