Breaking: उद्या पासून हे नियम बदलले.. जाणून घ्या कुठे झाले बदल… खिशाला पडेल ताण…
उद्या दि 1 जून पासून विविध क्षेत्रात बदल होणार आहेत. यात गॅस सिलेंडर च्या किमतींपासून ते क्रेडिट कार्ड चे देखील नियम बदलणार आहेत.
१ जूनपासून तुमच्या घरगुती खर्चाशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत. दर महिन्याच्या एक तारखेपासून अनेक नियमात बदल होतात. जून महिन्यात एलपीजी सिलिंडर, बँक सुट्ट्या, आधार अपडेट आणि ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. यामुळे तुमचे आर्थिक बजेटही बिघडू शकते.
1) पेट्रोल- डिझेल, एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल
एलपीजीची किंमत दर महिन्याच्या पहिल्या दिवशी ठरवली जाते. १ जून रोजी कंपन्या गॅस सिलिंडरच्या नवीन किमती ठरवणार आहेत. मे महिन्यात कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी केल्या होत्या. आता जूनमध्येही कंपन्या पुन्हा एकदा सिलिंडरच्या किमती कमी करू शकतील अशी अपेक्षा आहे. 1 जून रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होणार आहेत.
2) ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नवीन नियम जाहीर
1 जून 2024 पासून तुम्ही RTO ऐवजी खाजगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांवर ड्रायव्हिंग चाचणी देऊ शकणार आहात. या केंद्रांना परवाना पात्रतेसाठी चाचण्या घेण्यासाठी आणि प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी अधिकृत करण्यात येणार आहे. त्याशिवाय वाहतूक नियमाबद्दल झाले आहे. वेगाने वाहन चालवल्यास दंड ₹ 1,000 ते ₹ 2,000 च्या दरम्यान असेल. मात्र, जर एखादा अल्पवयीन वाहन चालवताना पकडला गेला तर त्याला ₹25,000 इतका मोठा दंड द्यावा लागणार आहे. तर वाहन मालकाची नोंदणी रद्द करण्यात येईल. तर अल्पवयीन व्यक्ती 25 वर्षांची होईपर्यंत परवान्यासाठी अपात्र असेल. आता तुम्ही 14 जूनपर्यंत आधार कार्ड ऑनलाइन मोफत अपडेट करु शकणार आहात. पण जर तुम्ही ते ऑफलाइन करणे निवडल्यास, तुम्हाला प्रत्येक अपडेटसाठी ₹50 द्यावे लागणार आहेत.
3) एलपीजी सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला अपडेट होतात. येत्या 1 जूनला तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर करतील. मे महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी झाल्या होत्या आणि जूनमध्ये पुन्हा सिलिंडरच्या किमती कमी केल्या जातील असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. ऑइल मार्केटिंग कंपन्या एअर टर्बाइन इंधन (ATF) आणि CNG-PNG च्या किमती देखील बदल होणार आहे. अशा परिस्थितीत, 1 जूनला त्यांच्या नवीन किंमती जाहीर होतील.
4) SBI क्रेडिट कार्डचे नियम 1 जून 2024 पासून बदलणार असून SBI काही क्रेडिट कार्डांसाठी सरकारी संबंधित व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट लागू होणार नाहीत, असं सांगितलंय. यामध्ये स्टेट बँकेचे AURUM, SBI Card ELITE, SBI Card ELITE Advantage आणि SBI Card Pulse, SimplyCLICK SBI कार्ड, SimplyClick Advantage SBI कार्ड (SBI Card Prime) आणि SBI कार्ड प्राइम (SBI Card PRIME) यांचा समावेश आहे.
5) वाहतुकीचे नियम कडक होणार
नव्या नियमांनुसार आता वाहतुकीचे नियमही कडक होणार आहेत. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना 25,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. या शिवाय परवाना देखील रद्द होऊ शकतो आणि 25 वर्षे नवीन परवाना मिळू शकणार नाही. याशिवाय इतर नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची तरतूद आहे. ज्यामध्ये वेगात गाडी चालवल्यास 1000 ते 2000 रुपये, विना परवाना वाहन चालवल्यास 500 रुपये, हेल्मेट न घातल्यास 100 रुपये आणि सीट बेल्ट न लावल्यास 100 रुपये दंड आकारला जाईल.
6) 14 जूनपर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट सुविधा
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI नुसार, जर तुम्ही तुमचे आधार कार्ड (Aadhar card update online) 10 वर्षांपासून अपडेट केले नसेल, तर तुम्ही 14 जूनपर्यंत तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करू शकता. UIDAI पोर्टलवर आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करण्याची सुविधा मोफत दिली जात आहे. मात्र, 14 जूननंतर तुम्हाला या कामासाठी पैसे द्यावे लागतील. तुम्ही हे काम आधार केंद्राला भेट देऊन देखील करू शकता. तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर गेल्यास तुम्हाला ५० रुपये शुल्क भरावे लागेल. तर UIDAI पोर्टलवर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
7) जूनमध्ये एकूण 12 दिवस बँकांना सुट्ट्या
जून महिन्यात बकरी ईद, वट सावित्री पोर्णिमा यासह विविध सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या (लोकसभा) सातव्या टप्प्यात एकूण 12 दिवस बँकांना सुट्ट्या असतील. देशात 1 जून रोजी बँकांना सुट्टी असेल. बँका बंद राहतील, या काळात तुम्ही बँकिंगशी संबंधित कोणतेही काम करू शकणार नाही. त्यामुळे बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे आधीच करुन घ्यावीत.






