Maharashtra

औशाच्या ग्रामीण भागात तंबाखूजन्य पदार्थांची किराणा दुकानातून चढ्या भावाने चोरून विक्री

औशाच्या ग्रामीण भागात तंबाखूजन्य पदार्थांची किराणा दुकानातून चढ्या भावाने चोरून विक्री

औसा प्रतिनिधी प्रशांत नेटके

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. जीवनावश्यक वस्तूंसाठी दुकाने उघडी ठेवण्यात आलेली आहेत. परंतु शहरात बंदचा परिणाम चांगला दिसून येत असला तरी ग्रामीण भागात मात्र गांभीर्याचा अभाव दिसून येत आहे. ग्रामीण भागात किराणा वस्तूची विक्री ,भाजीपाला खरेदी, मेडिकल ,दवाखान्याच्या नावाखाली नागरिकांचे बाहेर फिरणे वाढलेले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भात देशभरात वाढू नये यासाठी शासनाने देशभर संचारबंदी लागू केलेली आहे. १४ एप्रिलपर्यंत ही संचारबंदी राहणार आहे. औसा तालुक्यातील काही भागात संचारबंदीला जोरदार प्रतिसाद मिळत आहे परंतु काही भागात अजूनही गांभीर्याचा अभाव असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.ग्रामीण भागात
अनेक ठिकाणी किराणा वस्तूची जादा भावाने विक्री करणे, चोरुन किराणा दुकानांमूधन सुपारी, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी किराणा दुकानांमधूनच गुटखा, सुपारी विकली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
पोलीसांनी कांही ठिकाणी गुन्हेही दाखल केलेले आहेत. परंतु नागरीकांमध्ये त्याची जाणीव दिसून येत नाही. ग्रामीण भागात चोरुन किराणा दुकाना मधून तंबाखूजन्य पदार्थांची चढ्या भावाने विक्री सुरू ठेवण्याचे प्रकार दिसून येत आहेत.

प्रशासनाच्या सूचनांनंतरही अनेक भागात चोरी छुप्या पद्धतीने किराणा दुकानातून चढ्या भावाने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.दुकाने बंद ठेऊन काही विक्रेते तंबाखू, सिगरेट,गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करत असल्याचे आढळून येत आहे.
शहरी भागात गांभीर्य दिसत असले तरी ग्रामीण भागात सकाळी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. किराणा सामान खरेदी, भाजी खरेदी, औषधी खरेदीच्या नावाखाली रस्त्यावर भटकणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. लोक घराबाहेर पडण्यासच अधिक उत्सूक दिसत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. ग्रामीण भागात कोरोना गांभीर्याचा अभाव दिसून येत आहे.
संबंधित ग्रामपंचायत आणि पोलिसांनी दुकानदारांची चौकशी करून अशा दुकानदारांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button