Kolhapur

प्राचार्या सौ.रंजना आनंदा मगदूम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित.

प्राचार्या सौ.रंजना आनंदा मगदूम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित.

कोल्हापूर प्रतिनिधी -सुभाष भोसले

सिध्दर्नेली विद्यालय,ज्यूनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ रंजना आनंदा मगदूम यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याबद्दल अविष्कार फाउंडेशनचे सस्थापक संजय पोवार यांनी त्यांना क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित केले.
हा पुरस्कार त्यांना गणपतीपुळे येथे प्राप्त झाला.ज्येष्ठ साहित्यीक प्रा.किसनराव कुराडे,प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आबोकर,गडहिग्लज कारखान्याच्या संचालिका सौ क्रांतीदेवी कुराडे यांच्या हस्ते तर अविष्कार फाउंडेशन इंडियाचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार संजय पवार राज्यसंघटक आबासाहेब पवार,राज्य महिला संघटक सुचेता कलाजे,कोकण विभागीय अध्यक्ष् विजय केळकर,रत्नागिरी जिल्हाअध्यक्ष संदिप परटवलकर,सिधुदूंर्ग जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब हरमलकर,कोल्हापूर जिल्हाध्यक्षा सौ.शैला काबरे ,को जि मा शि कागल शाखा चेअरमन गंगाराम हजारे ,एस .आर. मगदूम,एम एम पाटील,रवी घराळ,अशोक घराळ,ए. पी .सारंग यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला.
त्यांना संस्थेचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे,सेक्रेटरी एन के .मगदूम,कर्नल दिलीपसिंह मंडलिक,श्री.कर्नल वेसवीकर यांचे प्रोत्साहन लाभले
प्राचार्या सौ. रंजना मगदूम यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांच्यावर आजी माजी विदयार्थी ,पालक शिक्षक यांचेकडून अभिनंदन होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button