Pandharpur

कोरोनामुळे रमजानमध्ये देखील सोशल डिन्स्टंस(सामाजिक अंतर)ठेवावे इफ्तार पार्टी करु नये

कोरोनामुळे रमजानमध्ये देखील सोशल डिन्स्टंस(सामाजिक अंतर)ठेवावे

इफ्तार पार्टी करु नये
खिदमत चॅरिटेबल ट्रस्ट पंढरपुर संस्थापक अध्यक्ष जुबेर हमीद बागवान यांचे आवाहन

प्रतिनिधी रफिक आतार

महाराष्ट्र मधील व पंढरपूर शहरांमधील सर्व मुस्लिम व इतर समाज बांधवांना जगभर आलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी २५ एप्रील रोजी रमजान महिन्याला सुरुवात होत असुन या काळात सोशल डिन्स्टंस(सामाजिक अंतर)म्हणून मुस्लिम बांधवांनी व इतर सामाजिक संघटनांनी इफ्तार पार्टीचे आयोजन करु नये. कोरोना च्या या लढाईला सर्व मुस्लिम बांधवांनी सहकार्य करावे. असे आवाहन खिदमत चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष जुबेर हमीद बागवान यांनी केले आहे.
मना-मनामधील दरी कमी करुन परस्परांमध्ये स्नेहभाव,सदभाव,वाढविण्यासाठी हा महिना संयम,त्याग,शांती सहिष्णुता, चांगुलपणा,प्रामाणिकपणा माणसाच्या ठायी विणावा यासाठी या सणाचे आयोजन करण्यात येते.शहरासह ग्रामीण भागात मुस्लिम बांधव व इतर सर्व समाजातील नागरिकांसाठी पवित्र रमजान महिण्याचे औपचारिक साधून सर्व समाजातील राजकीय, सामाजिक संघटना,पत्रकार व इतर व इतर इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते.मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजासह इतर सामाजिक संस्था व समाजातील पदाधिकाऱ्यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन व एकत्रीत नमाज पठण न करता आपल्या परिसरातील गोरगरीब गरजुवंताना अन्नधान्यचे वाटप करावे.व आपापल्या घरी नमाज पठनासह इबादत/तिलावत करावे, (ईश्वर)अल्लाह साऱ्या जगातील जीवितांना (मानव,पशु,पक्षी..) सुखी ठेवण्यासाठी दुआ करावी तसेच प्रशासनाच्या सुचनांचे पालन करीत प्रशासनाला सहकार्य करावे.असे आवाहन जुबेर हमीद बागवान यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button