Amalner: कहाणी हर्षलच्या जिद्द आणि चिकाटीची..!
अमळनेर जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आठ वेळा अपयशी ठरूनही
तालुक्यातील कावपिंप्री येथील हर्षल रवींद्र साळुंखे या तरुणाने स्पर्धा परीक्षांना सामोरे जात यशाला गवसणी घालत तो लोहमार्ग पोलीस पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे, यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हर्षलचे वडील शेतकरी असून त्याने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातील शाळेत पूर्ण करून नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला, आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरी मिळवून वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे होते, त्यासाठी सलग आठ भरती प्रक्रियांना तो सामोरे गेला मात्र कुठे उंची कमी पडली तर कुठे मार्क कमी पडले, अशा सलग आठ परीक्षा दिल्या, यश मिळत नव्हते, नाउमेद न होता, स्वतः वर विश्वास असल्याने, 2014 पासून सुरू केलेल्या अभ्यासाच्या बळावर 2023 मध्ये यश आले लोहमार्ग पोलीस या परीक्षेची मैदान व लेखी चाचणी उत्तीर्ण झाला आणि सर्व गावाला आनंद झाला. हर्षल घेत असलेली मेहनत संपूर्ण गावाने पाहिली होती, त्यामुळे च हर्षल चे अभिनंदन करण्यासाठी अख्खा गाव लोटला.मुलाचे कौतुक पाहून शेतकरी वडील
देखील भारावले आहेत.






