Yawal

दहिगाव चुंचाळे मार्गासह परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयानिय अवस्था आमदार लक्ष देतील का? ग्रामस्थांचे  प्रश्न

दहिगाव चुंचाळे मार्गासह परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयानिय अवस्था आमदार लक्ष देतील का? ग्रामस्थांचे प्रश्न

शबीर खान

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील दहिगाव व परिसरातील रस्त्यांची अतिशय मागील काही दिवसापासुन ठीकठीकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असुन रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता अशी दयनीय अवस्था झालेली आहे या पादचारी व वाहनधारक आणी शेतकऱ्यांच्या वहीवाट असलेल्या मार्गा कडे मात्र आमदार तसेच जिल्हा परिषद सदस्य अधिकारी हे पुर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याने वाहनचालकांमध्ये लोकप्रतिनिधींनी विरुद्ध कमालीचे संताप प्रकट होत आहे दहीगाव पंचाळा कोरपावली नावरा विरावली या रस्त्याची दैनावस्था झालेली आहे रस्त्यांवरून दुचाकी वाहन चालवणे सुद्धा अवघड झालेले आहे रस्त्यावर चार गावांचा प्रवास मोठ्या प्रमाणावर होत असतो रस्त्यावर मोठमोठे जीवघेणे खड्डे पडलेले असल्यामुळे या खड्ड्यांचे रुपांतर हे तलाव स्वरूप निर्माण झालेले आहे . या मार्गाने वाहनधारकांना वाहने चालवणे अतिशय अवघड झालेले आहे .नागरीकांच्या या समस्या कडे आमदारांचे मात्र दुर्लक्ष होत आहे . वेळी वेळी ग्रामस्थांनी आमदारा समोर आपली ग्रहाणे मांडले असतादेखील तात्पुरते आश्वासने देऊन ग्रामस्थांचे मनधरणी चे काम लोकप्रतिनिधी करीत आहेत अधिकारी याकडे डोळेझाक करीत आहेत जीवघेणी रस्त्यांवर त्वरित डांबरीकरण करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे विरावली रस्त्यावर सन १९९९पासून डांबरीकरण झालेले नाही तर कोरपावली रस्त्यावर गावालगत मोठमोठे काटेरी झुडपांनी रस्ता वेढला गेला आहे सावखेडा सिम नायगाव रस्ता हासुद्धा आधी जीवघेणा झाला आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button