मोठे वाघोदा येथे स्वामी विवेकानंद व जय जिजाऊ माता जयंती निमित्त अभिवादन…
मुबारक तडवी रावेर
रावेर : रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथे. गणेश नगरातील माळी वाड्यातील श्रीगणेश बहुउद्देशिय सभागृहात जय जिजाऊ व स्वामीविवेकानंद यांना माणुसकी समुह व समाज बांधवातर्फे जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.त्यावेळी जिजाऊ माता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पुजन करून सर्वांनी अभिवादन करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य संजय माळी अशोक माळी.गोकुल गौरखेडे कांतिलाल माळी मनोज महाजन रविंद्र माळी.बाळू धनगर.संदीप महाजन. रविंद्र चौधरी.रविंद्र माळी. कमलाकर माळी.यांच्यासह सर्व समाज बांधव उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाळु काकडे.व निलकंठ माळी यांनी परीश्रम घेतले.तसेच यशिका प्रदीप माळी या बालिकेने जिजामाता यांची वेशभूषा धारण करुन सर्वाचे लक्ष वेधले…






