Chalisgaon

?️ Big Breaking चाळीसगावात लाखोंचा बनावट रासायनिक खतसाठा जप्त ;  गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

?️ Big Breaking चाळीसगावात लाखोंचा बनावट रासायनिक खतसाठा जप्त ; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

मनोज भोसले

चाळीसगाव :- जास्तीची रक्कम घेऊन रासायनिक खते आणि बियाणे विक्री बरोबर आता बनावट रासायनिक खते चाळीसगावात विक्री होत असल्याचं उघड झालं असून कृषी विभागाच्या पथकाने ट्रकभर बोगस खतांचा साठा जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी उल्हास ठाकूर आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अरुण तायडे यांना गुप्त माहीतगाराने माहिती दिली की. गुजराथ येथुन बनावट रासायनिक खतांचा साठा घेऊन एक ट्रक चाळीसगाव येथे खाली होणार आहे त्यांनी महितिची जमवाजमव करून ट्रकचा पाठलाग करीत क्र.MH18/AA-7324 अडवला चालकाला खत कोठून आणले याची बिलं कुठे आहेत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली मधील बनावट रासायनिक खत 18:19:10 जिप्सन कंपनीचा बनावट खत साठा लागलीच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक साठे यांना बोलावून ताब्यात घेतला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यत सुरू होती.

खतांचा साठा हा गुजराथ मधून आला असुन त्यावर पत्ता मात्र कराड सातारा येथील असल्याने विभागिय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी उल्हास ठाकूर अरुण तायडे यांनी सांगितलं चढ्या भावाने बियाणे विक्री करून शेतकरी लूट करीत असतील अशा दुकानांवर कारवाई करण्यासाठी शेतकरी वर्गाने सरळ त्यांच्याकडे तक्रारी कराव्यात असे आवाहन देखील त्यांनी केले आहे, दरम्यान आधीच करोना महामारीने अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवाना बनावट खतांची विक्री करून नागवणारा पडद्यामागिल हा कृषी दुकानदार कोण यावर शहरात चर्चा रंगली आहे. घाटरोडवरील कृषी व्यवसायिकाचा हा माल असल्याचं सांगितलं जात असुन गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीच्या मुसक्या पोलीस बांधणार असल्याचं चर्चिल जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button