स्वामीनारायण मंदिरात ७१ दात्यांचे रक्तदान लायन्स क्लब आणि मंदिराचा संयुत उपक्रम
अमळनेर
प्रमुख स्वामीजी महाराज यांच्या १०० व्या जयंती निमित्त येथील लायन्स क्लब व स्वामीनारायण मंदिरातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ७१ जणांनी रक्तदान केले.
मंदिरात विश्ववंदनीय संत प.पू.प्रमुख स्वामीजी महाराज यांचा १०० वा जयंती महोत्सव लायन्स क्लब व BAPS मंदिरातर्फे साजरा करण्यात आला.
शिबिराला संतश्री योगीस्नेह स्वामीजी व अखंदमुनी स्वामीजी यांचे सहकार्य लाभले.यावेळी लायन्स क्लबचे प्रेसिडेंट विनोद अग्रवाल,ट्रेझरर प्रसन्ना जैन,प्रशांत सिंघवी,राजू नांढा, डॉ.बी.आर.बाविस्कर,महेश पवार,चेतन जैन,अमरीश अग्रवाल,चंदू वाणी,अतुल सोनी,अजय हिंदुजा तसेच भक्त परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.






