Baramati

बारामतीचा “स्मार्ट सिटी” दिशेने वाटचाल

बारामतीचा स्मार्ट सिटी दिशेने वाटचाल

प्रतिनिधी – आनंद काळे

बारामती – येत्या काही महिनाभरात बारामतीचा कायापालट होणार आहे.बारामतीतील काही महत्वकांक्षी प्रकल्पाच्या कामास सुरुवात होणार आहे.बारामतीच्या वैभवात आणिक भर पडणार असल्याने व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रकल्प मार्गी लागणार आहेत.हयात नीरा डावा कालवा सुशोभीकरण व मजबुतीकरण,कऱ्हा नदी स्वच्छता व सुशोभीकरण,तीन हत्ती चौकाचे सुशोभीकरण,भिगवण रस्त्याचे सुशोभीकरण,शहरातील रिंग रोडचे व शहरातील रस्त्याचे कामे मार्गी लावणे,बारामती बसस्थांनकाची नव्याने उभारणी,पोलीस मुख्यालयाचे काम,अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस ठाण्याची नवीन इमारत,शिवसृष्टी उभारणे,श्रीमंत बाबूजी नाईक वाड्याचे नूतनीकरण व संग्रहालय उभारणी,बारामतीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम पूर्णत्वास नेणे अशी अनेक कामे मार्गी लागणार आहेत त्यामुळे बारामतीच्या वैभवात अधिक भर पडणार आहे.
कोरोना रोगाचा प्रादुर्भावामुळे कोणत्याही कामावर परिणाम होऊ द्यायचा नाही असा शासनाचा आदेश असल्याने बारामतीत कामे आत्ता लवकर मार्गी लागणार आहे.बारामती शहराबाहेरील रिंग रोडचे जाळे हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असून,शहरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्याचा प्रयत्न आहे.तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले असून 500 खाटांच्या क्षमतेचे रुग्णालयही पूर्ण वेगाने पूर्णत्वास नेण्याची क्रिया झपाट्याने चालू आहे. येथे आधुनिक उपचाऱ्याच्या सोयी बारामती शासकीय रुग्णालयात सुरू व्हाव्यात अशी अपेक्षा आहेत.
आत्ता मात्र प्रत्यक्षात कामाची सुरुवात झाली असल्याने व ऐतिहासिक वस्तूचे जतन करण्यासाठी जोराचे प्रयत्न चालू असल्याने बारामतीचा स्मार्ट सिटी मध्ये उल्लेख होणे बाकी राहिले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button