नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उर्मटपणा विरोधात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची तक्रार
कोरोनाच्या सर्वेचे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नगरपालिकेच्या
आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी दिला जात असलेला त्रास, भेदभावाची व अपमानास्पद वागणूक तसेच धमक्यांबाबत आणि खोटी माहिती देऊन वरिष्ठांची दिशाभुल करत असल्याची तक्रार अंगणवाडी कर्मचार्यांनी
उपविभागीय अधिकारी आणि बालविकास आणि महिला कल्याण विभागाकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मा. जिल्हाधिकारी साो. सूचनेनुसार अंगणवाडी कर्मचारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या
अनेक दिवसांपासून कार्यरत आहेत. परंतु नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी व कर्मचारी वेळोवेळी बैठकीसाठी नगरपालिका दवाखान्यात बोलावतात. मात्र सदर बैठकीत बसण्याची, पिण्याच्या पाण्याची आणि
यासह अन्य सुविधा उपलब्ध नसते. तसेच बैठक दवाखान्याच्या पटांगणावर उघडया जागेवर उभे करुन घेतात. बैठकीमध्ये कामांच्या सुचनांपेक्षा धमक्याच जास्त दिल्या जातात.
शासनाने दिलेल्या सुचनेनुसार कोरोनाचे काम नियमित करत असतांना सुध्दा कोणतेही सहकार्य
मिळत नसून वरिष्ठांना मात्र आमच्याबाबत खोटी माहिती देऊन दिशाभूल केली जात आहे. कोरोनाच्या सर्वेचे काम
करण्यासाठी नगरपालिका दवाखाना ते कामाच्या परिसरात येण्याजाण्याची कोणतीही व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची सोय आदि मुलभूत सुविधा केलेल्या नाहीत.
याबाबत आम्ही विचारले असता धमकी देण्यात येते आणि तुमची कोणतीही सोय करणार नाहीत तुम्हाला काम करायचे असेल तर करा
अन्यथा नका करु असे धमकीवजा उत्तरे दिली जातात.
कोरोनाच्या सर्वेच्या संदर्भात कोणतेही प्रशिक्षण न.पा. आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेले नाही असे असतांना ज्या परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत अशा आणि गैरसोयीच्या ठिकाणी काम दिले जात आहे. आम्ही प्रशिक्षित नसल्यामुळे आरोग्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच त्यांच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना बाधित परिसर वगळून सोयीच्या ठिकाणी काम दिले
जात आहे अशाप्रकारचा भेदभाव आमच्याबाबत केला जात आहे.
दिनांक २४/०४/२०२० रोजी कोरोनाचे सर्वेचे काम करणाऱ्या ५ ते ७ अंगणवाडी सेविकांना जुलाब व उलटयांचा त्रास सुरु होता सदर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ही बाब आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणूनही तुम्हाला दिलेले काम पुर्ण करावेच लागेल अन्यथा आम्हाला लेखी द्या अशा धमक्या दिल्या
गेल्या अशा परिस्थितीतही अंगणवाडी कर्मचान्यांना दिलेले काम (टार्गेट) पुर्णपणे पार पाडले. कामाचा रिपोर्ट न.पा. दवाखान्यात सादर केला आणि जुलाब उलटयांबाबत आम्हाला गोळया औषधी द्या अशी मागणी केली असता न.पा. अधिकारी व कर्मचान्यांनी आम्हाला कुठल्याही गोळया व औषधी दिल्या नाहीत,
कोरोनाचे काम करूनही वरिष्ठांना खोटी माहिती देऊन आमच्याबाबत दिशाभूल करणे, आम्हाला माणस म्हणून वागणक न देणे, तब्बेत बिघडली असता औषधोपचार न करणे, आम्हाला भेदभावाची वागणक देणे.बैठक व्यवस्थित न घेता ग्राऊंडवर उभे करुन घेणे, आम्हाला कामकाजाबाबत योग्य मार्गदर्शन न करणे. वेळोवेळी धमक्या देणे अशाप्रकारचा त्रास न.पा. अधिकारी व आरोग्य कर्मचारी देत आहेत, त्यामुळे आमचे मनोधैर्य खचत आहे आणि कामावर विपरीत परिणाम होत आहे. या सर्व बाबींचा विचार करुन न.पा. आरोग्य
अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून चांगली वागणूक मिळावी आणि आम्हाला वरीलप्रमाणे दिला जाणारा त्रास बंद करण्यात अशी विनंती करण्यात आली आहे.
निवेदनावर उशा पाटील ,सुनिता भालेराव पाटिल,मीना भास्कर पाटील,कला बाई बनसोडे, सुनिता वसाने, रत्ना पाटील,सुचिता पाटील,इ च्या सह्या आहेत.






