Chandwad

शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवा अभाविप नाशिकची समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांकडे मागणी

शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवा अभाविप नाशिकची समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांकडे मागणी

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : सध्या MahaDBT या वेबसाईट वर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे शिष्यवृत्ती अर्ज भरले जात आहेत. सदर अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही ३१ मार्च आहे. परंतु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरतांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.जसे की BAMS या विद्याशाखेच्या प्रथम व द्वितीय वर्षाचे निकाल हे २४ मार्च रोजी जाहीर झाले त्यामुळे उर्वरित ७ दिवसात अर्ज भरणे सदर विद्यार्थ्यांना अशक्यप्राय आहे, कोरोना महामारीमुळे विविध शैक्षणिक कागदपत्रे मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत, तसेच शिष्यवृत्ती अर्ज भरतांना विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक अडचणी येत आहेत जसे की Server Error, Failed To Process OTP, Login Issues, Failed to Upload Document.
तरी यासारख्या अनेक समस्यांमुळे बहुतांश विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहिले आहेत. याची दखल घेत अभाविप नाशिकच्या शिष्टमंडळाने समाज कल्याण नाशिक विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. सुंदरसिंग वसावे यांना निवेदन दिले. यावेळी सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. श्री वसावे यांनी अभाविपच्या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद देत तारीख वाढवण्याबात नक्कीच पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.अभाविपच्या शिष्टमंडळात महानगर सहमंत्री ओम माळुंजकर, सिडको नगर सहमंत्री कौस्तुभ पिले, नाशिक जिल्हा आयाम, गतीविधी व कार्य राकेश साळुंखे, पंचवटी नगर सहमंत्री देवेश चिंचाळकर, मयूर फड यांचा समावेश होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button