Pandharpur

अखिल भारतीय छावा संघटनेने दिले मा. उपविभागीय अधिकारी श्री सचिन ढोले यांना निवेदन

अखिल भारतीय छावा संघटनेने दिले
मा. उपविभागीय अधिकारी श्री सचिन ढोले यांना निवेदन

प्रतिनिधी रफिक आत्तार

पंढरपूर शहरांमधील श्री संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज कै,सोपान महाराज नामदास यांच्या कुटुंबास शासनाची त्वरित मदत मिळण्या बाबत…
काही महिन्यापूर्वी पंढरपुरातून आळंदी वारीसाठी निघालेली श्री संत नामदेव महाराजांची पालखी सासवड च्या दिवे घाटातुन जात असताना अचानकपणे जेसीबी हे वाहन दिंडीमध्ये घुसल्याने श्री नामदेव महाराजांचे वंशज कै,सोपान महाराज नामदास व त्यांचे सहकारी हे जागीच मृत्यू पावले गेले होते.

अखिल भारतीय छावा संघटनेने दिले मा. उपविभागीय अधिकारी श्री सचिन ढोले यांना निवेदनमहाराष्ट्र शासनाने मृत व्यक्तीच्या कुटुंबाला व या घटनेतील जखमींना त्वरित मदत देऊ असे आश्वासन दिले होते तरी या घटनेला अनेक महिने उलटूनही शासनाची कसलिही मदत या कुटुंबाला मिळाली नाही तरी प्रशासनाने याची दखल घेऊन या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्यावा व शासनाकडून जाहीर झालेली रक्कम तात्काळ या कुटुंबाला देण्यात यावी,
अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना प्रशासनाच्या दारात बेमुदत धरणे आंदोलन करेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी ही विनंती.
अश्या विषयाचे निवेदन देताना अखिल भारतीय छावा संघटने चे शहराध्यक्ष सागर चव्हाण,शहर उपाध्यक्ष श्री सोपान काका देशमुख,शहर संघटक निलेश कोरके, समाजसेवक श्री संतोष जी कवडे,छावा चे जिल्हा उपाध्यक्ष श्री भास्कर जगताप,छावा संघटने शहर कार्याध्यक्ष श्री संतोष जगदाळे,छावा चे सददस्य श्री स्वप्निल शिंदे नाईक,छावा चे श्री विकी इंगोले,विशाल वाघमारे,व इतर उपस्थित कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button