Dewala

खामखेडा येथे कांदा चाळी तुन कांदा चोरीस गेल्याने भीतीचे वातावरण देवळा तालुक्यात कांदाचोरीचे सत्र वाढल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे.

प्रतिनिधी : महेश शिरोरे

देवळा : खामखेडा येथे कांदा चाळी तुन कांदा चोरीस गेल्याने भीतीचे वातावरण देवळा तालुक्यात कांदाचोरीचे सत्र वाढल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे.गेल्या तीन चार दिवसांत देवळा तालुक्यातील वाजगाव व वाखारी या गावामधून कांदा चोरिची घटना ताजी असतानाच शनिवार दि ३१ रोजी खामखेडा येथे कांदा चोरीची घटना समोर आली आहे.त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.
बाजारात कांद्याचे दर वाढल्याने साठवण केलेल्या कांदा चोरीच्या घटनेत आठवड्याभरात वाढ झाली आहे.खामखेडा येथिल शेतकरी आबाजी कारभारी शेवाळे यांच्या खामखेडा गावाच्या बुटीच्या रानाच्या भागातील कालव्याला लागुन असलेल्या (गट नं २१२) मध्ये असलेल्या कादां चाळीत चांगला भाव मिळेल या अपेक्षेने ६०० क्किंटल कांदा साठवून ठेवला होता.त्यातिल काही कांदा बाजारात विक्री केला होता.तर उर्वरित १५० किट्टल कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने निवड करूण साठवुन ठेवला होता.
परंतू राञी अज्ञात चोरटय़ांनी शिल्लक असलेल्या कांद्यापैकी ७ ते ८ क्विंटल कांदा चाळीतुन भरलेल्या पाट्यासहित चोरटय़ांनी लंपास केला.
आबा शेवाळे यांचे वडील कारभारी बाबुराव शेवाळे हे
दररोज रात्री या कांदा चाळीत कांदा राखण्यासाठी राहत होते.मात्र चोरट्यांनी कांदा चाळीत शेतकरी कांदा राखायला येण्याआधीच आठ वाजेच्या सुमारास डल्ला मारला.
हे रविवारी सकाळी शेतकरी शेतात गेले असता कांदा चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
आजच्या बाजार भावा प्रमाणे जवळपास ५० ते ६० हजाराचे नुकसान झाले आहे.कांदा चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकर्‍यांना दिवसभर शेतात काम व राञी कांदा चाळि राखाव्या लागत असल्याची वेळ येत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

चौकट
खरीप कांदा अतिवृष्टीमुळे गेला.तर उन्हाळी कांदा भाव वाढल्याने चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकर्‍यांना दिवसभर शेतात काम व राञी कांदा राखन करण्यासाठी जागरण करण्याची वेळ आली आहे.
छाया – (महेश शिरोरे खामखेडा ) खामखेडा येथिल कांदा उत्पादक शेतकरी कारभारी बाबुराव शेवाळे यांच्या याच चाळीतून कांद्याची चोरी झाली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button