Maharashtra

जिल्हाधिकाऱ्यांची मध्यप्रदेश सीमा भागाला भेट बाहेरील व्यक्तीस जिल्ह्यात प्रवेश देऊ नये-डॉ.राजेंद्र भारुड

जिल्हाधिकाऱ्यांची मध्यप्रदेश सीमा भागाला भेट
बाहेरील व्यक्तीस जिल्ह्यात प्रवेश देऊ नये-डॉ.राजेंद्र भारुड

प्रतिनिधी फहिम शेख

नंदुरबार दि.9- जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी महाराष्ट्र -मध्यप्रदेश सीमेवरील खेतिया खेडदिगर चेक पोस्टला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. बाहेरील जिल्ह्यातील किंवा राज्यातील कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्यात प्रवेश देऊ नये असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले.

तत्पूर्वी डॉ.भारुड यांनी शहादा येथे विविध विभागांचे अधिकारी, कोतवाल, ग्रामसेवक यांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन केले. शहादा शहरातील भाजीपाला विक्रीची ठिकाणे वाढवावीत आणि विक्रेत्यांना सुरक्षा पास द्यावेत. मास्क घातल्याशिवाय कुणालाही बाहेर फिरू देऊ नये. सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत अन्नधान्याचे वितरण नियमानुसार होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

बाहेरील जिल्ह्यातील व्यक्ती शहरात येऊ नये यासाठी ग्राम सुरक्षा दलाची त्वरीत स्थापना करावी. दलात चांगले चारित्र्य व समाजसेवी वृत्ती असलेल्या तरुणांचा समावेश करावा. 8 तासांच्या तीन पाळ्यांमध्ये गावाच्या सीमेवर लक्ष द्यावे. कोणत्याही व्यक्तीस गावात येऊ देऊ नये. बाहेरील व्यक्तीला गावात येण्यापासून रोखताना वाद न घालता गरज असल्यास पोलिसांना सूचना द्यावी, असे त्यांनी सांगितले. डॉ.भारुड यांनी सीमेवर तैनात असलेल्या पोलिसांचे चांगल्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले.
—-

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button