Mumbai

? Big Breaking.. आताची मोठी बातमी…शाळांसंदर्भात  झाला मोठा निर्णय.. पुढच्या वर्षी उघडणार शाळा …

? Big Breaking.. शाळांसंदर्भात झाला मोठा निर्णय पुढच्या वर्षी उघडणार शाळा …

मुंबई : करोनाचा कहर कमी होण्याची काहीच चिन्हे नाहीत. उलट सर्व नागरिक निष्काळजीपणाने वागत असल्याने आता ऐन थंडीत करोनाची दुसरी लाट आलेली आहे. त्यामुळे चालू वर्षी शाळा न उघडता थेट पुढच्या नवीन वर्षात याबाबत निर्णय घेण्याची घोषणा मुंबई महापालिकेने केली आहे.

महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी म्हटले आहे की, सोमवारपासून (23 नोव्हेंबर) मुंबई महापालिका क्षेत्रातील एकही शाळा सुरू होणार नाही. 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील सर्व सरकारी, खासगी शाळा बंदच राहणार आहेत.

लॉकडाऊननंतर सर्व व्यवहार हळुहळू पूर्वपदावर आले आहेत. दरम्यान दिवाळीची गर्दी आणि नागरिकांचा निष्काळजीपणा यामुळे पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर शाळा 31 डिसेंबरनंतर सुरू करण्यात निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यातील शाळांबाबत आता कोणता निर्णय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button