Amalner

अमळनेर सिंधी कॉलनीतून दोन मोटरसायकलींची चोरी-गुन्हा दाखल

अमळनेर सिंधी कॉलनीतून दोन मोटरसायकलींची चोरी-गुन्हा दाखल

रजनीकांत पाटील

अमळनेर – येथील चोपडा रोड वरील सिंधी कॉलनीत घरासमोर लावलेल्या दोन मोटरसायकल चोरट्यानी चोरून नेल्याची घटना दि. ११ रोजी रात्री घडली. या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की,सिंधी कॉलनीतील रहिवासी जितेंद्र बितराई व सुशील मोटवानी यांच्या एम.एच.१९ – सी.एच. ७१८६ व एम.एच.१९ – सी.बी. ९४४२ या क्रमांकाच्या मोटरसायकली दि. १० सप्टेंबर रोजी रात्रीघरासमोर उभ्या केल्या होत्या. मध्यरात्री सुमारास बितराई याना पाण्याची तहान लागल्यावर ते उठले तेव्हा त्यांना त्यांची मोटरसायकल आढळून आली नाही. त्यांनी मोटवानी यांना फोन लावला व मोटरसायकल जागेवर दिसत नसल्याचे सांगितले असता मोटवानी यांनी त्यांचीही मोटरसायकल दिसून येत नाही असे सांगितले. यामुळे अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद देऊन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुरुषोत्तम पाटील करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button