सावदा :अतिक्रमण धारकां विरूद्ध करण्यात येणारे 26 जानेवारी रोजी बेमुदत उपोषण तुर्त स्थगित!
युसूफ शाह सावदा
सावदा : येथील नगरपालिका हद्दीत येणाऱ्या गौसियानगर भागात गट क्रमांक 1209 प्लाट नंबर 6 ते 10 व गट क्रमांक 1214 प्लाट 28 चे जागेवर वाळूबंदी असतांनाही अवैधरित्या वाळू आणून एक वर्षापासुन इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी सावदा या संस्थेकडून एक भव्य इमारत बांधली जात आहे. येथील इमारत मंजूर नकाशानुसार नसून, उलट येथील इतर प्लाट धारकांच्या हक्कावर गदा आणून ओपन स्पेसवर बांधकाम सुरू असून, तेथे मनमानीपणे वापर केला जात असल्याचे लेखी तक्रार सर्व संबंधित अधिकारी यांना पाठवून
या लोकांवर कारवाई करून आम्हाला न्याय मिळावा अन्यथा येत्या “गणराज्य दिनी” . 26 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता न पा कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा येथील रहिवासी नागरिकांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांचे कडे केली होती. मात्र मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी कळविले आहे की, संबंधित लोकांना 2डिसेंबर 2020 रोजी नोटीस दिली आहे. परंतु मा. उच्च न्यायालयाकडे रीट पीटिशन दाखल असल्याने त्यांचे विरूद्ध 31जानेवारी 2021 पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे आपण कुठलेही उपोषणास बसू नये.त्यामुळे हायकोर्टा मान राखून, आम्ही दि 26 जानेवारी रोजी चे उपोषणाला स्थगित केले आहे.
मात्र 31 जानेवारी नंतर कारवाई न झाल्यास कोणत्याही क्षणी नगरपालिकेसमोर न्याय मिळे पर्यंत उपोषणाला बसण्याचा इशारा गौसियानगर भागातील नागरिकांनी दिला आहे.






