Rawer

ऐनपूर महाविद्यालयात झूम एँप व्दारे बहिनाबाईच्या जीवनावर प्रकाश.

ऐनपूर महाविद्यालयात झूम एँप व्दारे बहिनाबाईच्या जीवनावर प्रकाश.

संदीप कोळी

निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथून जवळच ऐनपूर येथिल ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाने चालविलेले सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामविस्तार वर्धापनदिनानिमित्त ” बहिणाबाई चौधरी जीवन व कार्य” या विषयावर कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जीवन आणि बहिणाबाईंची गाणी’ याविषयी माहिती सांगितली. खानदेशातील असोदा येथील माहेर असलेल्या बहिणाबाई महाजन कुटुंबातून सासरी जळगाव येथे चौधरी कुटुंबात आल्या. त्यांच्या मौखिक ओव्या या ‘बहिणाबाईंची गाणी’ म्हणून सुप्रसिद्ध आहेत. बहिणाबाई निसर्गाशी तद्रूप व्हायच्या व आपल्या कल्पनाशक्तीच्या भरारीने निसर्गावर ओव्या रचायच्या. म्हणून त्यांना निसर्गकन्या संबोधले जाते. त्यांच्या नावाने विद्यापिठाच्या नामविस्तार होणे हे खानदेश साठी अभिमानाची गोष्ट आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून मराठी विभागातील प्रा. एम. के. सोनवणे यांनी ‘बहिणाबाईंच्या साहित्यविषयक जाणिवा’ या विषयांवर प्रकाश टाकला. बहिणाबाईंचे माहेर आणि सासर, तेथील अनुभव, तेथील व्यक्ती, शेतकरी जीवनातील कामे, परिसरातील नातेसंबंध, याच बरोबर शाश्वत, चिरंतन अशी मानवी मुल्ये – मानवी मन यावर प्रकाश टाकला. माणसाने विचार केला तर तो खसखशीच्या दाण्याएवढा संकुचित स्वरूपाचा असू शकतो ; त्याच प्रमाणे संपूर्ण विश्वाला व्यापून टाकणारा व्यापक असा विचारही मानवी मन करू शकते. या त्यांनी मांडलेल्या विचारांनी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रभावित झाले. महाविद्यालयातील विद्यार्थी उदय विजय रायपूरे व कु. पाटील शुभांगी गणेश हिने बहिणाबाईंच्या कवितांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.रेखा प्रमोद पाटील यांनी केले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमास उपस्थित असलेल्यांचे आभारही प्रा.डॉ.रेखा पाटील यांनी मानले. कोविड-१९ च्या परिस्थितीत कार्यक्रम ऑनलाईन साजरा करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button