कळंब शहरात धक्कादायक प्रकार,महिलेवर तलवारीने हल्ला…
प्रतिनिधी-सलमान मुल्ला
याबाबत सविस्तर माहिती अशी की कळंब शहरातील बाबा नगर परिसरातील एक महिलेवर अज्ञात व्यक्तिने तलवारीने हल्ला केला.हा हल्ला नेमका कोणत्या प्रकरणातून झाली हे अद्याप कळू शकले नाही.
सदरील महिलेस काही युवकांनी कळंबच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे तर हल्लेखोर घटनास्थळी हुन फरार झाला आहे .याघटनेची माहिती मिळताच कळंब पोलिस यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे..






