Maharashtra

राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषदच्या धाराशिव जिल्हा अध्यक्ष पदी ह भ प बालाजी महाराज बोराडे यांची नियुक्ती

राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषदच्या धाराशिव जिल्हा अध्यक्ष पदी ह भ प बालाजी महाराज बोराडे यांची नियुक्ती

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

परंडा राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषदेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी ह भ प बालाजी महाराज बोराडे यांची नियुक्ती करण्यात आली त्यांची नियुक्ती राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. माधवानंद जी महाराज आळंदीकर आणि कार्याध्यक्ष ह भ प योगेश महाराज शिंदे ह भ प सुनील महाराज यादव (पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष) व उपाध्यक्ष , सचिव यांच्या संमतीने या पदावर निवड करण्यात आली आहे .
ह भ प बालाजी महाराज बोराडे हे मूळचे कात्राबाद येथील रहिवाशी असून ते अनेक वर्ष झालं कीर्तनकार शिवव्याख्याते ,संत तुकाराम महाराज जीवन चरित्र कथाकार, म्हणून महाराष्ट्रभर समाजप्रबोधनाचे काम करतात. त्यांनी झी टॉकीज वरील गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या मालिकेतही आपली कीर्तनसेवा सादर केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर ही जिम्मेदारी देण्यात आलेले आहे. राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषद अशा करते की आपण या कार्यक्षेत्रात निष्ठावंत लोकांना संघटित करून उत्कृष्ट कार्य करणी तयार कराल व परिषदेच्या मार्फत देव देश धर्म आणि समाजहिताचे कार्य कराल आशे नियुक्ती पत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button