Rawer

ऐनपूर महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.

ऐनपूर महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.

विलास ताठे

रावेर येथून जवळच ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात २५ जानेवारी मतदार जागृती दिनानिमित्त वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ, मतदान प्रतिज्ञा, संविधान वाचन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रा.भास्करराव आनंदराव पाटील रा.निंबोल ह.मु.पुणे यांनी महाविद्यालयाकडे रु २,०७,०००/- एवढी रक्कम ठेव म्हणून ठेवली असुन त्या्वरील व्याज बारावी विज्ञान, बी.एस्सी व बी ए.या वर्गातून प्रथम येणाऱ्या मुलांना व मुलींना प्रत्येकी १०००/-रु पारितोषिक म्हणून दिले. त्याच बरोबर काहि दानशूर व्यक्तींनी ठेवलेल्या ठेविं वरील व्याज बक्षीस स्वरूपात गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना, क्रिडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी, उत्कृष्ट ग्रंथालय वापर करणारा विद्यार्थी यांच्यासह विविध विषयांत प्राविण्यासह प्रथम, व्दितीय व तृतिय येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन व विविध शिबिर व युवारंगात सहभागींना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष भागवत विश्वनाथ पाटील हे होते. चेअरमन श्रीराम पाटील, सचिव संजय पाटील, विकास महाजन, डॉ सतिष पाटील, पांडुरंग पाटील, डॉ गंभीर पाटील, प्रविण महाजन,पी आर चौधरी,आर एस पाटील,हरी भिका पाटील,प्राचार्य डॉ. जे.बी.अंजने व सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.शारिरीक शि‌क्षण शास्त्र विषयात पीएचडी मिळवली म्हणुन डॉ सचिन झोपे यांचा व अर्थ मंथन या मासिकात उत्कृष्ट लेख पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ नीता वाणी यांचा सत्कार करण्यात आला.तसेच नवीन नियुक्त प्रा संदीप साळुंके यांचे स्वागत करण्यात आले. मार्च २०१९ च्या विद्यापीठ परीक्षेत दुसरा क्रमांक मिळविल्या बद्दल अंकिता रमेश चौधरी हिला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा एस पी उमरीवाड, प्रा.एस.आर.ईंगळे, प्रा.एस.बी.महाजन यांनी सूत्र संचालन केले. तर आभार उपप्राचार्य डॉ. पी.आर.महाजन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक प्राध्यापेकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहे.

फोटोत:- प्रमाणपत्र वाटप करूण युवारंग च्या विद्यार्थ्यांना गौरवितांना अध्यक्ष भागवत पाटील, चेअरमण श्रीराम पाटील, सचिव संजय पाटील, प्राचार्य डॉ. जे.बी.अंजने, उपप्राचार्य डॉ.पी.आर.महाजन सोबत संचालक मंडळ, संघप्रमुख प्रा.दिलीप सोनवणे, प्रा.एस.पी.उमरीवाड

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button