अमळनेर: पिंगळवाडे येथून युवा महिला बेपत्ता..
अमळनेर येथील पिंगळवाडे ह्या ठिकाणाहून एक 21 वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार मारवड पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की सोनाली राजेंद्र पारधी हीचे लग्न झाले होते परंतु 3 महिन्यांपूर्वी फारकत झाल्याने सदर मुलगी माहेरी पिंगळवाडे येथे राहत होती. दि.18 नोव्हेंबर रोजी मुलीची आई फिर्यादी उषाबाई राजेंद्र पारधी मजुरी करून घरी परत आली असता मुलगी आढळून आली नाही. आजूबाजूला शोध घेतल्यावर देखील मुलगी मिळून आली नाही. सदर महिलेच्या डाव्या हातावर SA असे गोंदलेले असून सोबत दोन ग्रॅमचे सोन्याचे कानातले डव 35 हजार रू रोख रक्कम असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. उषाबाई पारधी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून मारवड पोलिसात मिसिंग ची तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पो. हे. कॉ. सुनील अगोणे करीत आहे.






