India

Amazing: होय…अंडरगारमेंटला देखील असते एक्सपायरी डेट..

Amazing: होय…अंडरगारमेंटला देखील असते एक्सपायरी डेट..

औषधे, खाद्यपदार्थ, तेल, लोशन अगदी मेकअप पासून ते तुम्ही नियमित वापरत असलेल्या टूथब्रश पर्यंत सर्वच वस्तूंची एक्स्पायरी डेट असतेच. जसे की सर्वच डॉक्टर सांगतात की एक्सपायरी डेट संपल्यावर संबंधित वस्तू वापरणे टाळणेच हुशारीचे ठरते. अन्यथा यातून अनेक आजार व त्रासांना आयते आमंत्रण मिळू शकते. पण तुम्हाला माहित आहे का? तुम्ही वापरत असलेल्या अंडरगारमेंटचीही एक्सपायरी डेट असते.

अंडरगारमेंटचा योग्य वापर हा वैयक्तिक स्वच्छतेचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि एक्सपायरी डेटसंपलेल्या अंडरगारमेंटचा वापर करून तुम्ही स्वच्छतेशी तडजोड करणे योग्य ठरणार नाही, हो ना?

आता या एक्सपायरी डेटबद्दल एक चांगली व तितकीच संभ्रमात टाकणारी बाब म्हणजे बहुतेक तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की अंतर्वस्त्रे जसे की ब्रा व अंडरवेअर, बनियन कालबाह्य होण्याची कोणतीही विशिष्ट तारीख नसते. हे वापरावर तसेच कापडाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. अंडरगारमेंट किती काळ वापरायचे हे ठरवणारी कोणतीही वैद्यकीय पुराव्यावर आधारित कालमर्यादा नसली तरी दर तीन ते सहा ते बदलण्याची शिफारस केली जाते.

कोणत्याही अंडरवेअरची एक्सपायरी डेट म्हणजे तारीख नसते तर हा निर्णय काही घटकांना लक्षात घेऊन घ्यायला हवा. जर तुमची अंतर्वस्त्रे सैल झाली असतील किंवा त्यात छिद्रे असतील तर हे स्पष्ट संकेत आहे की नवीन खरेदी करण्याची वेळ आली आहे.
अंडरगारमेंट्स बर्‍याच काळासाठी वापरल्यानंतर ते बदलण्याची शिफारस करण्याचे कारण म्हणजे जर त्याच्या कापडाची सतत झीज होत असेल तर त्यात जीवाणू जमा होऊ शकतात, ही अंतर्वस्त्रे परिधान केल्याने शरीरावर पुरळ उठू शकते. यामुळेच तुमच्या प्रायव्हेट पार्टमध्ये इन्फेक्शन होऊ शकते.मुख्य गोष्ट अशी आहे की तुम्ही वर्षातून किमान दोन वेळा तरी अंतर्वस्त्रे बदलली पाहिजेत. पुन्हा एकदा हे लक्षात घ्या तुम्हाला तारीख नव्हे तर गुणवत्ता हा निकष वापरावा लागणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button