Amalner

अमळनेर:चोऱ्यांचे सत्र थांबेना..!बाम्हणे व वासरे शिवारातून 6 गुरे चोरीस..!

अमळनेर:चोऱ्यांचे सत्र थांबेना..!बाम्हणे व वासरे शिवारातून 6 गुरे चोरीस..!

अमळनेर तालुक्यात सतत चोऱ्या होत असून चोरट्यांनी संपूर्ण तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. कधी गाडी, कधी कॅश तर कधी पाळीव प्राणी देखील चोरट्यांनी सोडलेले नाही.गेल्या काही दिवसांत पशुधन चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आता तालुक्यातील बाम्हणे व वासरे शिवारातून चार शेतकऱ्यांची ७५ हजार रुपयांची सहा गुरे खळ्यातून चोरून नेल्याची घटना दि ८ डिसेंबर रोजी मध्यरात्री च्या सुमारास घडली आहे.याप्रकरणी चोरीचा गुन्हा मारवड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,तालुक्यातील वासरे येथील सुरेश शांताराम पाटील यांनी गुरे खळ्यात बांधली होती. ९ तारखेला सकाळी ते खळ्यात गेले असता त्याचा १५ हजार रु किंमतीचा गोऱ्हा आढळून आला नाही. आजूबाजूला तपास केला असता गोह्रा आढळून आला नाही त्यामुळे तो चोरीस गेल्याचे लक्षात आल्यामुळे मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच त्यांच्या शेजारील लीलाधर खंडू पाटील यांच्या मालकीची २० हजार रुपये किमतीची गाय देखील आढळून आली नाही.

त्याच प्रमाणे बाम्हणे येथील वसंत रावण पाटील यांच्या मालकीचा ८ हजार रुपये किमतीचा गोऱ्हा तर शेजारील धनराज गंभीर पाटील यांचे १६ हजार रु किमतीचे व १५ हजाराची गाय असे चार गुरे चोरट्याने चोरून नेली. त्यामुळे वसंत पाटील यांनी फिर्यादि नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button