Chalisgaon

गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाचा सर्वे करण्यासाठी व मन्याड ची उंची वाढविण्यासाठी पाठपुरावा करणार – आमदार मंगेश चव्हाण

गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाचा सर्वे करण्यासाठी व मन्याड ची उंची वाढविण्यासाठी पाठपुरावा करणार – आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव प्रतिनिधी नितिन माळे

गिरणा मन्याड पुनर्जीवन समितीचे निवेदन

चाळीसगाव – गिरणा व मन्याड ही तालुक्यासाठी संजीवनी असणारी प्रकल्प आहेत. त्यात मन्याड धरणाच्या माध्यमातून पाटचाऱ्या मधून शेतीलाही पाणी पुरविले जाते. त्यासाठी मन्याड ची साठवण क्षमता वाढवणे गरजेचे आहे. म्हणून मन्याड ची उंची वाढविण्याचे सर्वोतपरी प्रयत्न करत असून गिरणाचे पाणी मन्याड मध्ये आणण्यासाठी नदीजोड प्रकल्पाकरिता सर्वे करण्याचा पाठपुरावा करणार असल्याचे मत गिरणा मन्याड पुनर्जीवन समितीच्या सदस्यांसामोर निवेदन स्विकार करतेवेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केले.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, सरचिटणीस अमोल चव्हाण, समितीचे सदस्य दिपक पवार ( टाकळी प्र.दे.) भरत पाटील, पंकज रणदिवे (देवळी), भूषण बोरसे(चिंचखेडे), दिगंबर पाटील ( शिरसगाव), प्रवीण पवार (टाकळी प्र.दे.),दिपक पाटील (माळशेवगे) आदी उपस्थित होते.

गिरणा पाटबंधारे विकास महामंडळाचे इंजिनिअर विलास पाटील यांनी त्यातील टेक्निकल बाबी बैठकीत समजावून सांगितल्या.

चाळीसगाव तालुक्यात गिरणा व मन्याड या नदीवरील गिरणा व मन्याड ही दोन धरणे शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.परिसरातील तब्बल 32 गावांची शेती मन्याडच्या पाण्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या अवलंबून आहे.पाट चाऱ्यांच्या माध्यमातून मन्याड धरणाचे पाणी सर्वत्र पोहोचवले गेले आहे. मन्याडच्या पाण्याच्या माध्यमातून बागायती क्षेत्र वाढवता येऊ शकते.मात्र मन्याड धरण हे तुटीच्या क्षेत्रात येत असल्याने ते पूर्णपणे दरवर्षी भरत नाही. मन्याड धरण बऱ्याच वेळा कोरडेच राहते.आठ-दहा वर्षातून दोन किंवा तीनच वेळा धरण पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरले आहे.त्याची साठवण क्षमता सुध्दा कमी असून, धरण भरले तरी वर्षभर शेतीला पुरेल इतके बारमाही पाणी त्यात शिल्लक राहत नाही.मात्र गिरणा धरणाचा पाणीसाठा प्रचंड असून गिरणा धरणातून मन्याड धरणामध्ये पाणी आणले तर मन्याड धरण क्षेत्रातील 32 गावे पूर्णपणे बागायती होऊ शकतील.

गिरणा व मन्याड धरणांमधील अंतरही खूप कमी आहे. तसेच परिसरातील शेतकऱ्यांची समृद्धता मन्याड धरणावर अवलंबून आहे.त्यामुळे गिरणा व मन्याड या दोन धरणांचे नदीजोड करावे.त्यासोबतच मन्याड धरणातून निघालेल्या पाटचाऱ्यांची दुरुस्ती करावी. मन्याड धरणाजवळून जाणाऱ्या पाटचारीतून मोठया प्रमाणात पाणी वाया जाते.तसेच आजूबाजूच्या शेतांचेही नुकसान होते.बंद पाईपाद्वारे पाणी पाटचारीत सोडण्यात यावे.अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button