MaharashtraPandharpur

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने शहरातील विविध 13 ठिकाणी गणेश मुर्ती संकलन केंद्रावर संकलन करणार

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने शहरातील विविध 13 ठिकाणी गणेश मुर्ती संकलन केंद्रावर संकलन करणार

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहरातील नागरिक व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यांना नगरपरिषदेकडून जाहीर आवाहन करण्यात येते की, कोव्हीड-१९ च्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळणेच्या उद्देशाने गणेश विसर्जनासाठी पंढरपूर नगरपरिषदेने गणेशमुर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था केलेली आहे. तरी शहरातील नागरिकांनी व सार्वजनिक गणेश मंडळांनी नदीपात्रात अथवा तलावात गणेशमुर्तीचे विसर्जन न करता आपल्या नजीकच्या नगरपरिषदेच्या गणेश मुर्ती संकलन केंद्रात गणेशमुर्ती देऊन पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे.पंढरपूर नगरपरिषदे च्या वतीने खालील ठिकाणी गणेशमुर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था करणेत आलेली आहे.१) अर्बन बँक प्रशासकीय इमारतीसमोर २) भोसले चौक गणेश मंदीरासमोर ३) शेटे पेट्रोल पंपासमोर ४) के.बी.पी. कॉलेज चौक बसस्टॉप जवळ ५) प्रबोधनकार ठाकरे चौक ६) सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर ७) स्वा. सावरकर चौक, गजानन मेडीकल समोर ८) शिवतीर्थ, छत्रपती शिवाजी महाराज चौक ९) महात्मा फुले पुतळ्यासमोर १०) महाद्वार चौक पोलीस चौकीजवळ ११) मुक्ताबाई मठासमोर १२) अंबाबाई पटांगणा समोर, विठ्ठल मोबाईल शॉपीजवळ १३) यमाई तलाव गेटजवळ, टाकळी रोड या ठिकाणी गणेश मूर्तींचे संकलन केले जाणार आहे यासाठी नगर परिषदेने 30 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून या प्रत्येक संकलन केंद्रावर पोलीस विभागामार्फत पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button