Bollywood

Bollywood: रेखा आणि अक्षय कुमार यांच्या अफेयर मुळे  ही अभिनेत्री झाली नाराज..!बॉलिवूड मध्ये गाजली ही प्रेमकहाणी..!

Bollywood: रेखा आणि अक्षय कुमार यांच्या अफेयर मुळे पत्नी ही अभिनेत्री झाली नाराज..!बॉलिवूड मध्ये गाजली ही प्रेमकहाणी..!

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा 90 च्या दशकापासून एकावर एक हिट चित्रपट देताना दिसतोय. अक्षय हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अक्षय त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत अक्षयचे नाव जोडण्यात आलो होते. मात्र, सगळ्यात चर्चेत असलेले अक्षयचं रिलेशनशिप म्हणजे त्याचे आणि बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचे. रेखा (Rekha) या वयानं 13 वर्षे लहान असलेल्या अक्षयच्या प्रेमात होत्या. त्या दोघांच्या ब्रेकअपचं कारण अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना नाही तर दुसरी अभिनेत्री होती.

रिपोर्टनुसार, 1996 मध्ये आलेल्या ‘खिलाडियों का खिलाडी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय आणि रेखाची जवळीक वाढू लागली आणि लवकरच, अक्षय आणि रेखाचा रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या, ज्यामुळे अभिनेत्री रवीना टंडनला खूप असुरक्षित वाटू लागले. रवीनाच्या म्हणण्यानुसार, अक्षय रवीनासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे माहित असूनही रेखा अक्षयसोबत जवळ येण्याचा प्रयत्न करत होत्या. Rediff.com ला दिलेल्या जुन्या मुलाखतीत रवीना म्हणाली, ‘मला वाटत नाही की अक्षयचा रेखा यांच्याशी काही संबंध असेल. खरं तर, तो त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. अक्षयनं रेखा यांना चित्रपटामुळे सहन केलं. एका वेळेनंतर रेखा यांनी अक्षयसाठी घरातून जेवणाचा डब्बा आणायला सुरुवात केली होती. त्यावेळी मी हस्तक्षेप केला कारण या गोष्टी मर्यादेचा पलीकडे जात असल्याचे मला दिसले.

सिने ब्लिट्झला दिलेल्या दुसर्‍या एका मुलाखतीत रवीना म्हणाली की ‘ती रेखा यांना त्यांच्या हद्द देखील दाखवून देईल. जर या अभिनेत्रीला माहित असेल की आम्ही एकत्र आहोत आणि तरीही अक्षयच्या जवळ यायचा विचार करत असेल, तर मी त्यांना माझा हात दाखवेन. पण माझ्या अंदाजानुसार अक्षयला परिस्थिती कशी हाताळायची हे माहित आहे.’

दरम्यान, अक्षय आणि रेखा कधीच रिलेशनशिपमध्ये आले नाहीत. मात्र, त्यानंतर अक्षयची अभिनेत्री शिल्पा शेट्टीशी असलेली जवळीक पाहचा रवीनाला खूप चिंता वाटू लागली होती. असं म्हटलं जातं की अक्षयनंनंतर शिल्पा शेट्टीसाठी रवीनाची फसवणूक केली आणि शेवटी काही काळ डेट केल्यानंतर ते नातं देखील तोडलं. अक्षयनं शिल्पासोबत ब्रेकअप केला आणि नंतर ट्विंकल खन्नासोबत त्यानं लग्न केलं.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button