Maharashtra

अमळनेर शहराच्या १० भागात निर्धारित वेळेत होणार भाजीपाला-फळ आणि किराणा विक्री

“कोरोना”च्या पार्श्वभूमीवर न.प.ने भाजी बाजारातील गर्दीचे केले विक्रेंद्रीकरण

शहराच्या १० भागात निर्धारित वेळेत होणार भाजीपाला-फळ आणि किराणा विक्री

अमळनेर – कोरोना
व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावा
पासून बचावासाठी अमळनेर नगरपरिषदेने शासकीय निर्देशानुसार भाजी बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी गर्दीचे विक्रेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात नपाने विविध भागात ठरवून दिलेल्या १० ठिकाणी ५भाजीविक्रेते २ फळविक्रेत्यांना दुकाने लावण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभर लॉक डाऊन जाहीर केला आहे. पूर्वी दि.३१मार्च पर्यंत असलेला हा निर्णय आता १४ एप्रिल पर्यंत लागू रहाणार आहे.तर राज्यातील बाधित रूग्णांची संख्या वाढू नये यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांची भाजीपाला,फळे व किराणा घेण्यासाठी अधिक गर्दी मुख्य बाजाराच्या परिसरात येत असते.त्यातून आजारावर नियंत्रण आणणे शक्य होणार नाही. त्यामुळे मुख्य बाजारातील गर्दी कमी करण्याबरोबरच घराजवळ भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी अमळनेर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी याबाबतचे आदेश आज जारी केले आहेत.

यानुसार शहरातील पुढील १० ठिकाणे नपाने भाजीपाला व फळे विक्रीसाठी नक्की केली आहेत.

यात मुख्य डेली बाजार, आययुडीपी शॉपिंग कॉम्प्लेक्स,(तांबेपूरा),हाशमजी प्रेमजी शॉपिंग कॉम्प्लेक्स (स्टेशन रोड), नारायण मिस्त्री वाडी (ढेकू रोड), बोरसे नगर,विठ्ठल नगर(पिंपळे रोड),आर.के.नगर खुली जागा,विद्या विहार कॉलनी खुली जागा ,भगवा चौक (मराठा मंगल कार्यालय),पांढरी भाग(पैलाड),
साईबाबा मंदीर(पैलाड)

अमळनेर शहराच्या १० भागात निर्धारित वेळेत होणार भाजीपाला-फळ आणि किराणा विक्री

या बाबत नपाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, शहरातील मुख्य बाजारपेठ व भाजी मंडई व्यतिरिक्त अन्य प्रभागातील ठिकाणी वि्क्री करण्याची परवानगी दिली.
या आदेशाव्दारे आदेशित करण्यात येते की, कोरोना व्हायरस (कोविड 19)
संसर्ग बचावासाठी शासनाने भारतीय दंड संहीता कलम १४४ लागु केली असल्याने ५ पेक्षा
जास्त नागरीकांचा जमाव करण्यास मज्जाव केलेला असल्याने आपण दि.२४ मार्च, २०२० पासून पुढील आदेश होई पावेतो नगरपरिषदेने ठरवून दिलेल्या ठिकाणी ५ भाजीपाला
व २ फळ विक्रेता अशी ७ दुकाने लावण्यास परवानगी दिलेली असून ७ पेक्षा जास्त दुकाने लावता येणार नाही.त्यात ठरवून देण्यात आलेले अंतर ठेवावे लागेल. तसेच नगरपरिषद हद्दीत फिरते भाजीपाला-फळे विक्री करणा-यास परवानगी आहे.

परंतु त्यांनी एका ठीकाणी थांबू नये.अन्यथा कार्यवाही करण्यात येईल. तसेच विक्री करीत असलेल्या परिसरात सर्व
साफसफाई ठेवावी लागेल. तसेच दररोज भाजीपाला व फळे विक्रीची वेळ सकाळी ८ ते ११ व संध्याकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत ही निश्चित करण्यात आली आहे. तरी त्या-त्या परिसरातील नागरिकांनी आपल्या घराजवळच्या ठिकाणी जाऊन भाजीपाला खरेदी करावा. ही आपल्या आरोग्यासाठी केलेली सुविधा आहे याचे भान नागरिकांनी ठेवावे असे आवाहन न.पा.प्रशासनाने केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button