Amalner

?️ अमळनेर कट्टा… विप्रो केअर्स सहाय्यती शहरी आधार आरोग्य प्रकल्प यांच्या माध्यमातून व रोटरी क्लब यांच्या सहयोगाने मोफत नेत्र तपासणी …

?️ अमळनेर कट्टा… विप्रो केअर्स सहाय्यती शहरी आधार आरोग्य प्रकल्प यांच्या माध्यमातून व रोटरी क्लब यांच्या सहयोगाने मोफत नेत्र तपासणी …

अमळनेर : अमळनेर येथील आधार संस्था संचलित विप्रो केअर्स सहाय्यती शहरी आधार आरोग्य प्रकल्पाच्या माध्यमातून व रोटरी क्लब अमळनेर च्या सहयोगाने विविध कार्यक्रम नुकताच विप्रो कंपनीचे असिस्टंट मॅनेजर ( एफ ए जी पी प्लान्ट ) सुनिल वाघ साहेबांच्या अध्यक्षतेखाली अंदरपुरा येथे संपन्न झाले
शहरातील अंदरपुरा मोहल्ला येथे विप्रो केअर्स आधार शहरी प्रकल्पाच्या वतीने ६० पुरूष व महिलांची मोफत डोळे तपासणी करण्यात आली तर रोटरी क्लब अमळनेर च्या मार्फत एक ते सात महिन्याच्या बालकांना रोटरी क्लबचे अध्यक्ष अभिजीत भांडरकर, उपाध्यक्ष पुनम कोचर महेश पाटील यांच्या मुख्य उपस्थितीत ड्रेस व कीट देण्यात आली कार्यक्रमांच्या सुरूवातीला सर्व प्रमुख पाहुण्यांच्या आवास फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आले आधार संस्थांच्या अध्यक्ष डॉ भारती ताई पाटील कार्याध्यक्ष रेणु प्रसाद ताई विप्रो कंपनीचे किरण पाटील, अंदरपुरा मोहल्ला पंच कमेटी चे इकबाल शेख, मुबारक सैय्यद, अफसर पठान, सैय्यद नबी डाँ पंकज पाटील,वैशाली मेडम, तौसीफ शेख, सह आदींची मुख्य उपस्थितीत होती कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी आवास फाऊंडेशनचे अध्यक्ष अश्फाक शेख, उपाध्यक्ष सैय्यद अहेमद अली, सचिव नविद शेख, सदस्य जमालोदीन शेख, मजहर शेख,जाविद पठान, यांनी अनमोल सहकार्य केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मोहम्मद इकबाल शेख यांनी केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button