दिंडोरी लोकसभा खासदार डॉ. भारतीताई पवार यांची संसदेत मागणी १०८ ची सेवा सुरळीत करून अम्बुलन्सची संख्या वाढविण्याची मागणी
विजय कानडे दिंडोरी
नाशिक : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत गंभीररित्या पिडीत रुग्णांना तातडीने उपचार मिळण्याच्या हेतूने १०८ अम्बुलन्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये सेवा दिली जात आहे. विशेष म्हणजे अतिदुर्गम आणि आदिवासी भागात ह्या सेवेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. परंतु नाशिक जिल्ह्यातील पेठ, कनाशी, वणी, सटाना, पिंपळगाव बसवंत, ननाशी ह्या भागांत गेल्या काही दिवसांपासून हि सेवा बंद आहे. कारणास्तव तेथील रुग्णांना १०८ अम्बुलन्सची अति आवश्यकता असताना देखील ती वेळेवर उपलब्ध न झाल्याने पिडीत रुग्ण रुग्णालयात वेळेवर पोहचू शकत नाही आणि अशा कारणास्तव रुग्णांचा मृत्यू देखील होतो. दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती पवार यांनी संसदेच्या सभापती महोदयांच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला विनंती केली कि, ह्या विषयाचे पुनरावलोकन करून १०८ ची सेवा लवकरात लवकर सुरळीत सुरु करण्यात यावी आणि नाशिक जिल्यातील १०८ अम्बुलन्सची संख्या देखील वाढविण्यात यावी हि देखील मागणी यावेळी करण्यात आली.






