डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे मुस्लिम व देशमुख-राजपूत समाजाच्या स्मशानभूमीत एकाच दिवशी 125 वृक्षांची लागवड, करून प्रतिष्ठानने घेतली संगोपनाची जबाबदारी
चाळीसगांव प्रतिनिधी नितीन माळे
डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडातर्फे आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी शहरातील धुळे रोड कोतकर कॉलेज समोरील मुस्लिम कब्रस्थान तसेच चामुंडामाता मंदिरा जवळील देशमुख- राजपूत समाजाच्या स्मशानभूमीत रविवारी लिंबाच्या 125 रोपांची लागवड करून त्यांच्या संगोपणाची जबाबदारी प्रतिष्ठानने स्वीकारली.या उपक्रमाचे मुस्लीम तसेच देशमुख व राजपूत समाज बांधवांनी कौतुक केले. यावेळी राजपुत समाजाचे जेष्ठ नेते शिवाजी राजपूत, नगरसेवक सूर्यकांत ठाकूर ,किशोर देशमुख, रवींद्र चौधरी, प्रदीप राजपूत, चिरगोद्दीन शेख, कबरस्थान ट्रस्टचे सलीम शेख, शेख चांद अब्दुल रहेमान उपस्थित होते. तर राजपूत व देशमुख समाजातील टोनू राजपूत, महेंद्र शितोळे ,सुजित राजपूत , उदयसिंग राजपूत , विजय देशमुख सर , अशोक देशमुख , प्रशांत गायकवाड सर , प्रणव राजपूत , जितेंद्र राजपूत , सतिष देशमुख , कुमार राजपूत उपस्थित होते.







