थेपडे विद्यालय, म्हसावदचे उपशिक्षक श्री संदीप काशिनाथ भंगाळे यांना महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचा तात्यासाहेब ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर…
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
Faizpur : स्वा.सै.पं.ध.थेपडे माध्यमिक विद्यालय, म्हसावद येथे 23 वर्षापासून कार्यरत असलेले तसेच निंभोरा तालुका रावेर येथील मूळचे रहिवासी श्री.संदीप काशिनाथ भंगाळे यांचे त्यांच्या सेवेतील केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक, सामाजिक तसेच लॉकडाउन काळात केलेले ऑनलाइन काम, विषय ज्ञान वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न, गरीब होतकरू ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मदत करण्याची तळमळ, विद्यालयातील सहकारी बंधू-भगिनींना सोबत घेऊन व्यावसायिक कौशल्य वाढविण्याची धडपड, विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन, विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांना कार्यक्रमांना उपस्थिती, विषय ज्ञानात पारंगत तसेच चारित्र्यसंपन्न, कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडविण्याची जिद्द अशा विविध विचार करून जळगाव ग्रामीण विभागातून राज्य समता शिक्षक परिषदेतर्फे दिनांक 28 नोव्हेंबर 2020 महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी म्हणजेच शिक्षक दिनाच्या दिवशी तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला.
लॉक डाऊन संपल्यानंतर यथावकाश सहकुटुंब हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.






