Nandurbar

पवित्र मोहर्रम व उर्स निमित्त विविध कामांचे त्वरीत आदेश होणे कामीचे निवेदन सादर.

पवित्र मोहर्रम व उर्स निमित्त विविध कामांचे त्वरीत आदेश होणे कामीचे निवेदन सादर.

नंदुरबार/फहिम शेख

AIMIM चे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सैय्यद रफ़अत हुसैन व त्यांचे सहकाऱ्यांनी आज रोजी पालिका मुख्याधिकारी नंदुरबार यांना निवेदन सादर केले कि, वर्ष 2019 पासुन ते वर्ष 2021 या काळात कोरोना महामारीमुळे शासनाकडून सर्व प्रकारचे धार्मिक सन उत्सवांना संपूर्णतः बंदी असतांना या वर्षी शासनाने पुर्णतः बंदी उठवल्याने येथे 800 वर्ष पेक्षाही जास्त वर्षांची परंपरा असलेले सर्व धर्मियांचे श्रद्धा स्थान असलेले सैय्यद अलाउद्दीन उर्फ इमान बादशाह बाबा व सैय्यद शेर अबुल गाजी बाबांचे उर्स, त्यात मानतांची चादरे व मोहर्रमचे अखाडे दरवर्ष प्रमाणे या वर्षीही पूर्ण उत्साहाने साजरे होत आहे ज्यात महाराष्ट्र तसेच गुजरात, मध्य प्रदेश व इतर राज्यातुन लाखो श्रद्धाळू हजेरी लावतात. इमाम बादशाह बाबाचे उर्स मध्ये झुले-झुळके, लहान मुलांचे खेळणी साहित्य, संसार उपयोगी साहित्य व चहा नाश्ता चे स्टॉल मोठ्या प्रमाणावर लावले जातात. या कार्यक्रमांना यशस्वीपणे पार पाडणेकामी विविध शासन यंत्रणांसह आपले कर्तव्यही अति महत्वाचे असते.
खालील सूचनांवर विशेष लक्ष देऊन त्वरीत कार्यादेश देण्यात यावे ही विनंती. → 1. स्टेशन रोड ते हाट दरवाजा अली साहब मोहल्ला घोडापीर- मच्छी बाजार – अंबेडकर पुतळा ते दर्गाह रस्त्याची डागडुजी व दुरुस्ती.. → 2. मच्छी बाजार तेLT ग्राउंड ची साफ सफाईचे काम त्वरीत लावणे.→ 3. मच्छी बाजार ते LT ग्राउंड सह दर्गाह पर्यंत पावसाळ्यामुळे झाडेझुडपे रस्त्यावर आली असुन ती त्वरीत व्यवस्थित करण्यात यावे.→ 4. सदर मार्गावरील गटारींची साफ सफाई होऊन DDT पावडरचे शिरकाव करणे.★ 5. उर्स काळात मच्छी बाजार किंवा साक्री नाका येथे फायरफायटर ठेवणे.. → 6. सदर मार्गावर असलेले स्ट्रीट पोल वरील सर्व स्ट्रीट लाईट दुरुस्ती/बदली करून सुरु करावे विशेष कर मच्छी बाजार ते दर्गाह पर्यंतचे. • 7. उर्स काळात सदर मार्गावर जड वाहनांना प्रवेश बंदी.→ 8. रस्त्यावर लोमकळत असलेले विधुत तार दुरुस्त करणे. 9. या भागाची विधुत DP वरचा लोड वेळीच बलेंस करणे.★ 10. उर्स काळात डॉक्टरांची टीम कार्डीयाक सह दर्गाह, साक्री नाका व मच्छी बाजार येथे Emergency साठी हजर ठेवणे.महोदय, वरील सर्व कामांना कमीत कमी दोन ते तीन दिवस लागणार आहे व दिनांक 07 08-2022 पासुन सर्व कार्यक्रमांना सुरवात होणार आहे तरी वरील सूचनांवर त्वरीत अंमलबजावणीचे आदेश करण्यात यावे हीच नम्र विनंती.

वरील निवेदनाची प्रत त्यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार, जिल्हा पोलिस अधीक्षक नंदुरबार, जिल्हा शल्यचिकित्सक नंदुरबार तसेच मुख्य कार्यकारी अभियंता वीज विभाग नंदुरबार यांना दिली आहे.

निवेदन देते वेळी त्यांचे सोबत री. प्राध्यापक रशीद अली, फरीद खान, आरिफ़ हमीद, हाफिज़ अबदाल पठाण, मुजाहिद शेख हे होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button