Maharashtra

विनयनगर पोलीस चौकीचे उदघाटन

विनयनगर पोलीस चौकीचे उदघाटन

सुनिल घुमरे

गेले अनेक वर्षांपासून प्रभागातील महिला व नागरिकांची विनयनगर, दीपाली नगर परिसरात पोलीस चौकी करणेसाठी मागणी होती. मुंबई नाका पुलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय ढमाळ साहेब, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांचे मोलाचे मार्गदर्शनाने तसेच प्रभाग.क्र २३ अ च्या नगरसेविका सौ.रुपाली यंशवंत निकुळे, माजी नगरसेवक यशवंत केशव निकूळे, श्री राम नगर येथील दशरथ नंदन बहू.संस्था,भक्त मंडळ व महिला मंडळ,विनय नगर मित्र मंडळ,साईनाथ नगर मित्र मंडळ,अमृतवर्षा कॉलनी मित्र मंडळ,दिपाली नगर मित्र मंडळ,व परिसरातील कार्यकर्ते यांच्या सहकार्याने पोलिस चौकी उभारण्यास यश आले.

*सदर पोलीस चौकीचे उदघाटन मंगळवार दि:- 28/7/2020 रोजी दु. 12.28 वाजता पोलीस आयुक्त नाशिक मा. श्री विश्वास नांगरे पाटील साहेब, परिमंडळ १ चे पोलीस उप आयुक्त मा. श्री. अमोल तांबे साहेब, मुख्यालय पोलीस उपआयुक्त मा.श्रीमंती पौर्णिमा चौंगुले मॅडम, विभाग २चे सहायक पोलीस आयुक्त मा. श्री.मंगलसिग सुर्यवंशी साहेब, मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री विजय ढमाळ साहेब,पोलीस उपनिरीक्षक श्री. चेतन श्रीवंत साहेब,नगरसेविका सौ. रुपाली यंशवंत निकुळे,माजी नगरसेवक यशवंत केशव निकूळे, बुलेट पोलीसचे संपादक हेमंत साळी विनय नगर पोलिस चौकीचे सर्व कर्मचारी तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button