Amalner

विप्रो कंम्पनी तर्फे शिरूड येथे संतूर साबण वाटप गावकऱ्यांनी मानले आभार

विप्रो कंम्पनी तर्फे शिरूड येथे संतूर साबण वाटप गावकऱ्यांनी मानले आभार

रजनीकांत पाटील

अमळनेर : ज्यावेळी अमळनेर शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता त्यावेळी विप्रो कंपनी, अमळनेर व आधार संस्था अमळनेर यांनी संपूर्ण तालुक्यात व शिरुड गावात संतुर साबणाचे वाटप केले होते आणि आता शिरुड गावात कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने पुन्हा एकदा विप्रो कंपनी व आधार संस्था यांनी शिरुड ग्रामस्थांना संतुर साबण उपलब्ध करून दिले आहे. त्याचे शिरूड ग्रामपंचातीने घरपोच जाऊन प्रत्येकी 3 साबण वाटप केले.

या वेळी गावतील सरपंच सुपडू पाटील, ग्रामसेवक गुलाबराब सूर्यवंशी, पोलीस पाटील विश्वास महाजन, मा. सभापती शाम अहिरे, वि.वि. कार्यकारी सो. चे प्रा सुभाष पाटील व ग्रामपंचायत शिपाई सतीश पाटील व योगेश पाटील व गावतील पत्रकार शरद कुलकर्णी व रजनीकांत पाटील अमोल पाटील इंजि प्रफुल्ल पाटील बाळकृष्ण पाटिल आदींची उपस्थिती होती. या कामासाठी तिलोत्तमा ताई यांचे मोठे योगदान लाभले. ग्रामस्थांनी विप्रो कंपनी, अमळनेर व आधार संस्था अमळनेर यांचे मनापासून आभार मानले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button