Nashik

थोरात विद्यालयात आदिवासी व क्रांतीदिन उत्साहात साजरा..

थोरात विद्यालयात आदिवासी व क्रांतीदिन उत्साहात साजरा..

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी

मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात व ज्युनिअर काॅलेज मोहाडी विद्यालयात आदिवासी व क्रांतीदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बाळासाहेब अडसरे होते.अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते बिरसा मुंडा,महात्मा गांधी,स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब अडसरे यांनीही आदिवासी समाजाचे देशाच्या विकासामध्ये व स्वातंत्र्य मिळविण्यामध्ये मोठे योगदान आहे.तसेच क्रांतीकारकांनी देखील देशाला स्वांतत्र्य मिळविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, त्यांच्या प्रयत्नातुन देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे, आपण सर्वांनी बिरसा मुंडा व महान देशभक्ताचा व सर्व क्रांतीकारकांचा आदर्श घ्यावा असे सांगितले.

कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रामनाथ यांनी केले व शरद निकम यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button