Maharashtra

बकरी ईद साधेपणाने साजरी करावी:जुबेर हमीद बागवान यांचे आवाहन

बकरी ईद साधेपणाने साजरी करावी:जुबेर हमीद बागवान यांचे आवाहन

प्रतिनिधी रफीक आत्तार

देशामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण मुस्लिम समाजाने बकरी ईद साधेपणाने साजरी करावी व शासनाला सहकार्य करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे मुस्लिम समाजाला भावनिक आवाहन खिदमत चॅरिटेबल ट्रस्ट पंढरपुर चे संस्थापक अध्यक्ष जुबेर हमीद बागवान यांनी केले. लोकप्रधान’शी बोलताना ते म्हणाले, ज्याप्रमाणे रमजान ईद मध्ये मुस्लिम बांधवांनी सहकार्य केले तसेच सहकार्य बकरी ईदला देखील करावे. जे मुस्लिम बांधव बकरी ईदला कुर्बानी देतात त्यांनी कुर्बानीसाठी होणारा खर्च टाळून तो खर्च होतकरू, गरजू, दीन दुबळ्या किंवा सध्याच्या कोरोना परस्थितीला तोंड देणार्‍या नागरिकांना आर्थिक मदत करून करावा. किंवा एक वेगळा पर्याय म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करून देखील ईद साजरी करता येते असेही जुबेर हमीद बागवान म्हणाले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button