रिपाई आठवले गटाचे तहसील कार्यालयावर निषेध आंदोलन
प्रतिनिधी कृष्णा यादव
अक्कलकोट प्रतिनिधी – महाराष्ट्रात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात दलित आणि बौद्धांवरील अत्याच्यार वाढत आहेत ७ जुलै रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह येथील हल्ला.
लोकडाऊनच्या काळात अनेक ठिकाणी हल्ले झाल्याचे घरे जळण्याचे, दलित व बौद्ध तरुणांच्या हत्या झाल्याचे निषेधार्ह प्रकार घडले आहेत.
दलित आणि बौद्धांवरील वाढत असलेल्या अत्याच्यार रोखण्याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे. बौद्ध व दलितांवरील अत्याच्यार वाढत असताना ते रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे.
राजगृहावर झालेल्या हल्ल्याची सी आई डी चौकशी व्हावी व हल्लेखोराला त्वरित जेरबंद करावे,दलित आणि बौद्धांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी तसेच दलित आणि बौद्धांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार व राज्य सरचिटणीस मा.राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक तहसील कार्यालय अक्कलकोट येथे निदर्शने व आंदोलन करून प्रशासन अधिकारी बी डी माढे मॅडम यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना अविनाश मडिखांबे यांनी बोलताना म्हणाले जेंव्हा जेंव्हा ही राष्ट्रवादी,काँग्रेसची सरकार या महाराष्ट्रात सत्येत आले आहे तेंव्हा तेंव्हा दलित व बौद्धांवर हल्ले झाले असुन हे सरकार पुरोगामी चेहरा लावून मनुवादी विचारधारा परत असुन अश्या सरकारचा निषेध केला व शासन दरबारी आमच्या मागण्या मान्य करण्यात यावे अन्यथा याहून उग्र आंदोलन करु असा इशारा दिला शहर अध्यक्ष प्रसाद माने,सुरज सोनके यांनी आपली मते मांडली.
यावेळी जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी,युवक तालुका अध्यक्ष अप्पा भालेराव,ता.उपाध्यक्ष अंबादास गायकवाड,चंद्रकांत गायकवाड,विजयकुमार पोतेनवरू,संदीप गायकवाड,दत्ता कांबळे,सूरज सोनके, श्रीशैल इसामंत्री, विलास गायकवाड,शाखा अध्यक्ष उत्तम गायकवा, राजु भगळे,अप्पश्या लच्याण,राजु बोरगावकर,इरणा दसाडे, खाजप्पा पोतेनवरू,नागेश कांबळे,सुरेश गायकवाड,मंजुनाथ बनसोडे,आशिष उखरंडे,गुरुषांत दोडमनी,अंबादास शिंगे,हर्ष गायकवाड,दीपक मडिखांबे,नागेश मडिखांबे,वकील मडिखांबे,रोमित मडिखांबे,पुटुराज मडिखांबे,व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






