अजिंक्य गोडगे व रेणुका कोकाटे यांची उपजिल्हाधिकारी व तहसीलदार पदी निवड झाल्याबद्दल आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे
कल्याणसागर समुहातील सरस्वती प्राथमिक शाळा व कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी अजिंक्य अशोक गोडगे व रेणुका जगन्नाथ कोकाटे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयेगाच्या परीक्षेत अनुक्रमे उपजिल्हाधिकारी व तहसीलदार पदी निवड झाल्याबद्दल कल्याणसागर समुहाचे संस्थपक अध्यक्ष आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 च्या जाहीर झालेल्या निकालात अजिंक्य अशोक गोडगे उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी पदासाठी पात्र ठरला आहे. अजिंक्य गोडगे हा कल्याणसागर समुहातील सरस्वती प्राथमिक शाळेचा इ.१ली ते ७ वी पर्यंतचा विद्यार्थी असुन तहसीलदार पदासाठी पात्र ठरलेली रेणुका जगन्नाथ कोकाटे ही इ. १ ली ते ७ वी सरस्वती प्राथमिक शाळेची व ८ वी ते १० वी पर्यंतची कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी होती.
उपजिल्हाधिकारी निवड झालेला अजिंक्य गोडगे आणि तहसीलदारपदी निवड झालेली रेणुका कोकाटे यांचा कल्याणसागर समुहाचे संस्थापक अध्यक्ष आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला.
यावेळी कल्यासागर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. किरण गरड, सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत पवार, कल्यासागर समुहाचे सदस्य श्री. अजित पाटील आदी उपस्थित होते.






