Amalner: चोऱ्यांचे सत्र : खवशी येथून विद्युत तारा चोरीस..!
अमळनेर तालुक्यातील खवशी येथील एका शेतातून आठ हजार रुपये
किमतीच्या 900 मीटर अल्युमिनियम च्या विद्युत तारा चोरून नेल्याची घटना 16 रोजी घडली असून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील खवशी येथील शेत शिवारातील गट क्र.86 मधील तीन शेतातून गेलेल्या अल्युमिनियम च्या सुमारे आठ हजार रुपये किमतीच्या सुमारे 900 मीटर तारा अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना 16 रोजी उघडकीस आली असून उमेश गोविंदा वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहे.






