Ratnagiri

दापोलीत आदिवासी समाज भवन बांधण्यासाठी दापोली तहसीलदारांशी आदिवासी संघटनांची चर्चा

रत्नागिरी: दापोलीत आदिवासी समाज भवन बांधण्यासाठी आदिवासी संघटना पदाधिकारी यांनी आज तहसीलदार दापोली यांच्याशी चर्चा केली व निवेदन दिले. दापोली कॅम्प परिसरात आदिवासी समाज भवन बांधण्यासाठी 7/12 उतारा मिळाला आहे. त्यापुढील कार्यवाहीसाठी दापोली तहसीलदार यांनी मार्गदर्शन केले.
समाज भवनासाठी आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना निवेदन दिली आहेत व पाठपुरावा करत आहेत.
याच बरोबर आदिवासी बांधवांना नवीन रेशनकार्ड देणे, नवीन रेशनकार्ड धारकांना धान्य मिळणे,आधारकार्ड काढण्यासाठी येणार्या समस्या इत्यादी विषयांवरही चर्चा करण्यात आली.
यावेळी बिरसा क्रांती दलाचे कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष सुशीलकुमार पावरा,आदिवासी आदिम कातकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विठोबा जगताप, सचिव महेश वाघमारे, सल्लागार कृष्णा हिलम,अशोक पवार, माल्या जाधव,दामू पवार कार्याध्यक्ष, निरा वाघमारे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शांताराम जाधव आदि आदिवासी बांधव उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button