Amalner

अमळनेर :उत्तर महाराष्ट्र (विभागीय) राष्ट्रीय ओबीसी महासंघाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

उत्तर महाराष्ट्र (विभागीय) राष्ट्रीय ओबीसी महासंघाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

अमळनेर, प्रतिनिधी- भारत स्वतंत्र झाल्यापासून आज तागायत पर्यत ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली नाही, जातिनिहाय जनगणना का होत नाही? असा प्रश्न ओबीसी समाजाला पडला आहे.मोदी सरकारने तर ओबीसींचे हक्क-अधिकार काढून टाकले आहेत त्यांना हक्क अधिकारापासून वंचित केले आहे.देशात 52 टक्‍के ओबीसी समाज असून आजही शासनकर्ते या समाजाचा हक्क- अधिकारापासून वंचित ठेवत आहे. ओबीसी प्रवर्गातील बारा बलुतेदार समाजाला शिक्षणाच्या नोकरीच्या अधिकारापासून दीर्घकाळ गुलाम करण्याचे मोदी सरकारचे षड् यंत्र दिसत आहे ओबीसी समाजाला हक्क अधिकार मिळणे करिता मोठा लढा, आंदोलन उभे करायचे आहे त्यासाठी सर्व बारा बलुतेदार समाज एकत्र येऊन एकजुटीने,एकतेचा धागा होऊन कार्य करण्याचे आवाहन (राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष) नानासाहेब डी डी पाटील यांनी केले.
सदरच्या आढावा बैठकीचे आयोजन धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले होते. मा. भटू चौधरी (उ महा. विभागीय अध्यक्ष, ओबीसी महासंघ) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
सदर बैठकीत उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. बैठकीत मा. प्रवीण महाजन (अध्यक्ष-क्रांतिसूर्य तात्यासाहेब ज्योतिराव फुले विचारमंच) यांनी सर्व ओबीसी वर्गाला एकत्र येणे ही काळाची गरज आहे.ओबीसींची जनजागृती झाली पाहिजे ,जर येणारा काळात ओबीसी वर्ग एकत्र न आल्यास सर्व प्रकारचे आरक्षण काढले जाऊ शकते असे सूतोवाच त्यांनी मनोगतात व्यक्त केले.
बैठकीला मा. भटू चौधरी बोलताना म्हणाले की, ओबीसी समाज आजही शिक्षण, नोकरी पासून वंचित आहे, यापुढे नोकरी अधिकारापासून या समाजाला गुलाम बनवायचे शासक वर्गाचे षडयंत्र असून यापुढे तरुण, युवकांना शिक्षण संदर्भात कुठलीही समस्या उद्भवल्यास , अडचणी आल्यास ओबीसी महासंघ मदत करेल तसेच यापुढे सरकार शिष्यवृत्ती बंद करत आहे. अशा प्रश्नांना वाचा फोडली जाईल असे ठाम मत त्यांनी मनोगतात व्यक्त मांडले.
याप्रसंगी नानासाहेब डी. डी पाटील (अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ) मा. भटू चौधरी (विभागीय अध्यक्ष) मा. नरेंद्र चौधरी (विभागीय सचिव) मा.दत्तात्रेय चौधरी (विभागीय कार्याध्यक्ष)मा. सुनील भाऊ चौधरी (विभागीय उपाध्यक्ष) मा. लंकेश चौधरी (विभागीय सचिव) मा. रघुनाथ कदम, मा. राजेंद्र कदम, मा. धनराज नेरपगार, मा. प्रवीण महाजन (अध्यक्ष महात्मा फुले विचार मंच) मा. संजय महाजन, मा. रवींद्र जाधव (अध्यक्ष युवा परिट धोबी समाज) मा. पितांबर पाटील (माजी सरपंच चौबारी)मा. अरुण चौधरी, मा. राजेश कोठावदे, मा. जयंतलाल वानखेडे ,मा. दिपक खोंडे, मा. राजेंद्र ठाकरे, मा. अशोक सुर्यवंशी सर, मा. मनोज रामकृष्ण पाटील,मा.राधेश्याम पाटील मा.प्रा.अनिल पाटील, मा. प्रा.अरुण महाजन, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीम निवेदिता कापडणेकर (मुख्याध्यापिका शांतीनिकेतन प्राथ विद्या मंदिर)सौ.स्नेहल शिसोदे आदी महिला शिक्षिका उपस्थित होत्या तसेच धनदाई एज्युकेशन संस्थेच्या विविध युनिट मधील प्राचार्य/ मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button