Viral Katta: इलियाना डिक्रुझने दिली गुड न्यूज..! नेटकऱ्याच्या बेहुदा प्रश्नाला दिलं कडक उत्तर..!
अभिनेत्री इलियाना डिक्रूझने नुकतीच चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत इलियानाने गरोदर असल्याचं जाहीर केलं. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र त्याचसोबत इलियानाचा पती आणि बाळाचा होणारा पिता कोण, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रेग्नंसीच्या या चर्चांदरम्यान आता इलियानाने एका चाहत्याला दिलेल्या सडेतोड उत्तराची चर्चा होत आहे. एका चाहत्याने इलियानाला सोशल मीडियावर तिच्या व्हर्जिनिटीबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर तिने बेधडक उत्तर देत ट्रोलरचं तोंड बंद केलं होतं.
2019 मध्ये इलियानाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनअंतर्गत चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली होती. मात्र या प्रश्नोत्तरांदरम्यान एका चाहत्याने इलियानाला असा प्रश्न विचारला, जो वाचून तिच्या रागाचा पारा चढला. ‘तू तुझी व्हर्जिनिटी कधी गमावलीस’, असा प्रश्न एका युजरने तिला विचारला होता. युजरच्या या प्रश्नाचं उत्तर देताना इलियानाने लिहिलं, ‘वाह, नोसी (इतरांच्या खासगी आयुष्यात नाक खुपसण्याची सवय असणारे) तुझी आई यावर काय म्हणेल?’
इलियानाने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत गरोदर असल्याचं नुकतंच जाहीर केलं. लहान बाळाच्या ड्रेसचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ‘.. आणि प्रवासाला सुरुवात’ असा मजकूर त्या ड्रेसवर लिहिण्यात आला आहे. तर आणखी एका फोटोमध्ये इलियानाच्या गळ्यात एक पेंडंट पहायला मिळतंय. ‘मम्मा’ अशा अक्षरांचा तो पेंडंट आहे. हे दोन्ही फोटो पोस्ट करत इलियानाने कॅप्शनमध्ये ‘लवकरच..’ असं लिहिलं आहे. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून आणि इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.






