Amalner

मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशनच्या वतीने पारोळा तालुक्यातील टोळी गावातील घटनेच्या निषेधार्थ म उपविभागीय अधिकारी व म तहसीलदार यांना लेखी निवेदन

मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशनच्या वतीने पारोळा तालुक्यातील टोळी गावातील घटनेच्या निषेधार्थ म उपविभागीय अधिकारी व म तहसीलदार यांना लेखी निवेदन

अमळनेर येथील मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशनच्या वतीने पारोळा तालुक्यातील टोळी गावातील घटनेच्या निषेधार्थ म उपविभागीय अधिकारी व म तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन अश्या अरोपीना न सोडता फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशन तर्फे देण्यात आलेल्या लेखी निवेदनात असे म्हटले आहे की पारोळा तालुक्यातील टोळी गावातील २० वर्षीय तरूणी एफ वाय बी ए ला शिक्षण घेणारी हुशार व होतकरू विद्यार्थीनी मुलगी आपल्या मामा कडे येते तेथून तीन वैशी मुले अपहरण करून एका बाईकडे घेऊन जातात व त्यांच्यावर सामुहिक अत्याचार करतात या घटनेची सर्व समाज निंदा करीत आहे अत्याचार करताना मुलीचे मृत्यू देखील झालेले आहे ह्या महिन्यातील ही दुसरी घटना घडली आहे सदरील आरोपींचा खटला जलद न्यायालयात चालविण्यात यावे आणि आरोपींना फाशीच्या शिक्षेची सुनवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष रियाज शेख, अब्दुल सत्तार मास्टर, जहुर मिस्तरी,लोक संघर्ष मोर्चाचे पन्नालाल मावळे शकिल काझी, अँड साजिद शेख, आधिवासी पारधी विकास परिषदचे अविनाश पवार, अँड सलमान शाह, शराफत मिस्तरी, बाळू पाटील,इक्बाल शेख, अमजद अली शहा,सह आदि उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button