Amalner: गुन्ह्या नंतर अवघ्या 6 दिवसांत पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या..! जलद आणि स्मार्ट तपासामुळे दरोड्या चे आरोपी गजाआड..!
दि. 24 मार्च रोजी रात्री सुमारे 12.15 वाजेच्या सुमारास जानवे गावाच्या पुढे असलेल्या पांडुरंग पेट्रोलपंपावर दोन अज्ञात इसमांनी बंदुकीचा धाक दाखवुन पेट्रोलपंपावरील कॅशिअर यांचे कडुन सुमारे 36,500/- रु. बळजबरीने हिसकावून नेले म्हणुन अमळनेर पोलीस स्टेशनला भा.द.वि कलम 392, 34 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यांच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक एम. राज कुमार यांनी घटनास्थळी भेट देवुन गुन्ह्यांतील आरोपीचा तात्काळ शोध घेण्यासाठी आदेश दिले होते. तसेच अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी देखील भेट देवुन गुन्ह्यांचा आढावा घेवुन त्याप्रमाणे गुन्ह्यांत उपयुक्त सुचना दिल्या. सदर गुन्ह्यांत वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदारांचे तीन वेगवेगळी पथके तयार केली व आरोपीचे बारकाईने निरीक्षण करून तसेच गुन्ह्यांतील सी.सी.टि. व्ही. फुटेज मधील आरोपीतांचे बारकाईने निरीक्षण केले असता आरोपीनी परिधान केलेले कपडे, बुट व वाहन यांचे अवलोकन करून आरोपीचा शोध होणेकामी पथकांना सुचना केल्या. त्या दरम्यान मिळालेल्या गोपनिय माहीती वरुन संशयित इसमांचा बारकाईने तपासणी करून त्यांना विश्वासात घेवुन त्यांनी गुन्हा केल्याबाबत निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करून नमुद आरोपीकडुन पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान 77,400 /- कि.चा मुद्देमाल
हस्तगत करण्यात आला असुन, त्यात 1 गावठी बनावटीचे पिस्टल, 3 जिवंतकाडतुस (गोळ्या) व गुन्ह्यांत वापरण्यात आलेली मोटर सायकल आणि पेट्रोलपंपावरील कॅशिअर यांचे कडुन बळजबरीने हिसकावुन नेलेल्या पैश्या पैकी 1700/- रु. रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
या गुन्ह्याच्या तपास कामी पथकात वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोउनि विकास शिरोडे, पोउनि अनिल भुसारे, पोहेकाँ. किशोर पाटील, पोना. दिपक माळी,
पोना. डॉ. शरद पाटील, पोना. रविंद्र पाटील, पोना. योगेश महाजन, पोना. सिध्दांत सिसोदे आदींचा समावेश होता.






