Nashik

दिल्ली येथील माजी सैनिकांच्या आंदोलनास दिंडोरी तालुका माजी सैनिकांचा पाठिंबा

दिल्ली येथील माजी सैनिकांच्या आंदोलनास दिंडोरी तालुका माजी सैनिकांचा पाठिंबा

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी
दिंडोरी-
दिल्ली येथे सुरू असलेल्या माजी सैनिकांच्या वन रँक वन पेन्शन-2 व विविध मागण्यांसाठी आंदोलनास दिंडोरी तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने दिंडोरी तहसीलचे मंडळ अधिकारी भगवान काकड यांना निवेदन देऊन आंदोलनास पठिंबा दिला आहे.
निवेदनाचा आशय आंदोलन हे कोणत्याही राजकीय पक्ष अथवा सरकार विरोधात नसून अधिकाऱ्या बाबत तर बिलकुलच नाही इंग्रज राजवटी पासून भारतीय सैनिकांवर जे नियम कष्टदायिनी लादले होते तेच नियम अद्यावत आहे .भारतीय सैनिक जान जाये पर वतन न जाये घेतला वसा टाकणार नाही समोर कितीही बलाढ्य दुश्मन असलं तरी छातीवर गोळी घेऊ परंतु पाठ दाखवणार नाही व भारत मातेला कलंक लागू देणार नाही या नियमाचे पालन करत आले भारत माता हीच देवता महाराष्ट्र हाच एक आमचा धर्म यानुसार देशाप्रती प्रेम करत आलेला सैनिक आणि या सैनिकास इंग्रज राजवटीप्रमाणे वागणूक मिळत आहे याची खंत आहे. उदाहरणार्थ अधिकाऱ्याला गोळी लागली उचित सन्मान दिला जातो व जवानाला गोळी लागली तेवढ्यापुरतं गुणगान केलं जात तसेच अशा अनेक त्रुटी जवान व ऑफिसर यामध्ये आहे तरी भारत सरकारला विनंती असेल आज दिल्ली येथील जंतर मंतर येथे गेल्या महिन्यापासून आंदोलन चालू आहे त्यास आम्ही दिंडोरी तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने पाठिंबा देत आहे.लवकरात लवकर मागण्या मान्य व्हाव्यात तालुकाच नव्हे तर गावागावातून आंदोलन छेडले जाईल एक गोष्ट आवर्जून सांगावेसे वाटते सैनिक हा खेड्यापाड्यांतील शेतकरी पुत्र आहे, अंत पाहू नये
निवेदनावर माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष भारत खांदवे, माजी सैनिक गणपतराव जाधव ,उत्तम बैरागी ,अमर निरगुडे, बलवंत ठाकणे ,विकास दिघे, चंद्रकांत कळमकर, हिरामण पिंगळ, सुरेश बा-हाते यांच्यासह 40 माजी सैनिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button