बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, संगीत व कला अकादमी – कला विभाग आयोजित रांगोळी स्पर्धा २०१९-२० चा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
मुंबई / प्रतिनिधी मिलिंद जाधव
बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, संगीत व कला अकादमी – कला विभाग आयोजित रांगोळी स्पर्धा २०१९-२० चा पारितोषिक वितरण समारंभ ना.म.जोशी मनपा शालेय सभागृह, लोअर परेल येथे संपन्न झाला.
या पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सन्मा. शिक्षणाधिकारी श्री. महेश पालकर, सन्मा. उपशिक्षणाधिकारी (मध्यवर्ती ) श्री. प्रकाश च-हाटे, सन्मा. उपशिक्षणाधिकारी (शहर) श्री. राजू तडवी, सन्मा. उपशिक्षणाधिकारी (खासगी अनुदानित / विनाअनुदानित शाळा) कीर्तीवर्धन किरतकुडवे, सन्मा. उपशिक्षणाधिकारी (विशेष कार्य) श्रीम. संगीता तेरे, सन्मा. प्राचार्या, संगीत विभाग श्रीम. सुवर्ण गौरी घैसास, निदेशिका, कार्यानुभव विभाग श्रीम. तृप्ती पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर स्पर्धेच्या रांगोळी परीक्षणासाठी मान्यवर परीक्षक म्हणून श्री. उमेश पांचाळ, श्री. निलेश निवाते व श्री. विपुल पाटील यांनी उत्कृष्टपणे काम पाहिले.
सदर स्पर्धा सन्माननीय शिक्षणाधिकारी श्री. महेश पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली कला विभागाने यशस्वीरित्या आयोजन केले.






