प्रतिनिधी/शिर्डीनसल्याने शिर्डी येथे बाहेर गावावरून आलेले मजूर,तसेच प्रवासी ,बंदोबस्तासाठी आलेले पोलीस,आरोग्य सेवक तसेच सफाई कर्मचारी याना युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेकडून मोफत ,नाश्ता ,पाणी बॉटल,तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले तसेच शिर्डीत ज्या ज्या लोकांना ,लॉक डाऊन मुळे उपासमारीची वेळ आलेली आहे अश्या सर्व लोकांची जबाबदारी युवा शिर्डी ग्रामस्थ या संघटनेने घेतलेली आहे ,आज शिर्डी बसस्टँड ,साईश कॉर्नर,पालखी रोड, नगरपालिका कर्मचारी ,जे कर्मचारी घरापासून लांब राहतात अश्या कर्मचाऱ्यांना मोफत नाश्त्याची व्यवस्था लॉकडाऊन
असल्यामुळे अखंड पने चालूच ठेवण्यात येणार आहे ,त्याप्रसंगी युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेचे नितीन कोते ,महेशभाऊ रेवगडे(जिल्हा अध्यक्ष छत्रपती युवा सेना)’किरण कोते,अभिजित पाचोरे,मंगेश उगले,अभिषेक शेळके,अभिजित कोते, निखिल कोते ,अभि शिंदे ,संकेत कोते ,प्रसाद लोढा,प्रसाद बावचे,शुभम सुराणा,आदी कार्यकर्ते उपस्थित होते





